Mahayuti Rally 2026:महायुतीच्या एकत्रित ताकदीवर स्मिता जाधव, कौस्तुभ गावडे यांच्या विजयाचा विश्वास

Spread the love

(पिंपरी) : भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना (एकनाथ शिंदे) आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) या महायुतीतील घटक पक्षांची पिंपरी-चिंचवड शहरात मोठी ताकद आहे. सर्व पक्षांच्या एकत्रित प्रयत्नांतून पुणे पदवीधर मतदारसंघाच्या उमेदवार डॉ. स्मिता योगेश जाधव आणि शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार कौस्तुभ गावडे यांच्या विजयासाठी प्रयत्न केले जातील, असा विश्वास केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केला. आकुर्डी येथे सोमवारी (दि. १९) झालेल्या महायुतीच्या मेळाव्यात दोन्ही उमेदवारांच्या प्रचारासाठी एकजुटीने काम करण्याचा निर्धार करण्यात (Mahayuti Rally 2026)आला.

 

दोन्ही उमेदवारांच्या प्रचारार्थ आकुर्डी येथील ग. दि. माडगूळकर नाट्यगृहात या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महापौर रवी लांडगे, आमदार महेश लांडगे, शंकर जगताप, उमा खापरे, अमित गोरखे, माजी खासदार अमर साबळे, माजी आमदार अश्विनी जगताप, विलास लांडे, भाजपचे शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष योगेश बहल, शिवसेनेचे शहरप्रमुख नीलेश तरस, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे शहराध्यक्ष कुणाल वाव्हळकर, भाजपचे शहर प्रभारी भरत पाटील, उपमहापौर शर्मिला बाबर, सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांच्यासह महायुतीतील घटक पक्षांचे पदाधिकारी, नगरसेवक, कार्यकर्ते, शिक्षक आणि मतदार उपस्थित(Mahayuti Rally 2026) होते.

 

मोहोळ म्हणाले की, पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी येत्या शुक्रवारी मतदान होत आहे. पिंपरी-चिंचवड शहरात पदवीधर मतदारसंघाचे ७ हजार २८१, तर शिक्षक मतदारसंघाचे २ हजार ९४ मतदार आहेत. या मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी महायुतीचे सर्व नेते आणि कार्यकर्ते प्रचारात सक्रिय आहेत. पुणे विभाग हा गेल्या २५ वर्षांपासून भाजपचा परंपरागत मतदारसंघ असल्याचे सांगत यंदाही हा मतदारसंघ कायम राखण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त (Mahayuti Rally 2026)केला.

 

डॉ. स्मिता जाधव यांची महिला, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात स्वतंत्र ओळख आहे. त्यांना महायुतीतील सर्व पक्षांचा पाठिंबा आहे. कौस्तुभ गावडे यांचाही पश्चिम महाराष्ट्रात चांगला जनसंपर्क आहे, असे मोहोळ यांनी नमूद(Mahayuti Rally 2026) केले.

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात विद्यापीठे, आयआयटी आणि अन्य शैक्षणिक संस्थांची संख्या वाढली असून शिक्षण क्षेत्रात अनेक बदल झाले आहेत, असे मोहोळ म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही शिक्षण क्षेत्रात विविध निर्णय घेतले असून शिक्षक भरती सुरू केली आहे. शिक्षकांच्या जुन्या पेन्शन योजनेबाबत सरकार सकारात्मक असल्याचेही त्यांनी सांगितले. केंद्र आणि राज्य सरकारचे हात बळकट करण्यासाठी डॉ. स्मिता जाधव आणि कौस्तुभ गावडे यांना विधानपरिषदेवर पाठविण्याचे आवाहन त्यांनी (Mahayuti Rally 2026)केले.

 

भाजपचे शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे म्हणाले की, शहरातील भाजपचे सर्व १४ मंडलाध्यक्ष प्रचारासाठी काम करत आहेत. महापालिका निवडणुकीनंतर महायुतीचे घटक पक्ष पुन्हा एकाच व्यासपीठावर आले आहेत. पिंपरी, चिंचवड आणि भोसरी या तिन्ही विधानसभा मतदारसंघांतून दोन्ही उमेदवारांना मताधिक्य मिळवून देण्यासाठी एकजुटीने काम केले (Mahayuti Rally 2026)जाईल.

 

माजी आमदार विलास लांडे यांनी पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील मतदारांची संख्या लक्षात घेऊन प्रत्येक २५ मतदारांमागे एका कार्यकर्त्याची नियुक्ती करण्याचे नियोजन करण्याची सूचना (Mahayuti Rally 2026)केली.

 

शिवसेनेचे शहरप्रमुख नीलेश तरस म्हणाले की, खासदार श्रीरंग बारणे राजगड दौऱ्यावर असल्याने मेळाव्याला उपस्थित राहू शकले नाहीत. शिवसेना, युवासेना आणि महिला आघाडी निवडणुकीसाठी काम करत असून डॉ. स्मिता जाधव यांना पक्षाचा पूर्ण पाठिंबा असल्याचे त्यांनी (Mahayuti Rally 2026)सांगितले.

 

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे शहराध्यक्ष कुणाल वाव्हळकर यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची असल्याचे सांगितले. पक्षाचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या सूचनेनुसार महायुतीच्या दोन्ही उमेदवारांसाठी कार्यकर्ते काम करत असल्याचे त्यांनी नमूद(Mahayuti Rally 2026) केले.

 

विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर म्हणाले की, पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची निवडणूक सुशिक्षित मतदारांची असल्याने सर्वांनी ती गांभीर्याने घ्यावी. पक्षाच्या नेत्यांनी दिलेल्या सूचनांचे पालन करून उमेदवारांच्या प्रचारासाठी काम करण्याचे आवाहन त्यांनी(Mahayuti Rally 2026) केले.

 

राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष योगेश बहल म्हणाले की, पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या सूचनेनंतर कार्यकर्ते प्रचाराला लागले आहेत. डॉ. स्मिता जाधव यांना अधिकाधिक मतदान व्हावे, यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी (Mahayuti Rally 2026)केले.

 

मेळाव्याचे सूत्रसंचालन मोरेश्वर शेडगे यांनी केले, तर सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे यांनी आभार (Mahayuti Rally 2026)मानले.

 

महायुती एकत्रितपणे प्रचारात सक्रिय

 

पिंपरी-चिंचवड शहरात पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी महायुतीतील घटक पक्षांनी एकत्रितपणे प्रचार करण्यावर भर दिला आहे. मेळाव्यात विविध पक्षांचे आजी-माजी पदाधिकारी एकत्र आले होते. दोन्ही उमेदवारांना शहरातून अधिकाधिक मते मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचा निर्धार पदाधिकाऱ्यांनी व्यक्त(Mahayuti Rally 2026) केला.

 

मतदान करताना जांभळ्या रंगाच्या पेनचा वापर करण्याचे आवाहन

 

या निवडणुकीत मतदान ईव्हीएमऐवजी मतपत्रिकेद्वारे होणार आहे. मतपत्रिकेवर उमेदवाराचे नाव आणि छायाचित्र असेल. निवडणूक कर्मचाऱ्यांनी दिलेल्या जांभळ्या रंगाच्या पेनने पसंतीच्या उमेदवाराच्या नावापुढील चौकटीत ‘१’ हा क्रमांक लिहावा. चौकटीबाहेर क्रमांक लिहिल्यास मत बाद होऊ शकते, असे मतदारांना सांगण्यात(Mahayuti Rally 2026) आले.

 

 


Spread the love

Related posts

Ye Aankhen dekhkar:साठवणीतली गाणी पुष्प १८ : ये आँखें देखकर हम सारी दुनिया भूल जाते हैं…

Ujani Dam Project: प्रस्तावित प्रकल्पांविरोधात शेतकरी-कष्टकऱ्यांचा रास्ता रोको

Signature Park Society:डांगे चौकातील सिग्नेचर पार्कमध्ये आई-मुलाचा मृत्यू