Pune Ghazal Program:अमिता पैठणकर यांना दीपक करंदीकर स्मृती गझल पुरस्कार जाहीर | पुणे कार्यक्रम

Spread the love

पुणे : रंगत-संगत प्रतिष्ठान आणि करम प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने प्रतिष्ठेचा ‘दीपक करंदीकर स्मृती गझल पुरस्कार’ यंदा ज्येष्ठ गझलकार अमिता पैठणकर यांना जाहीर करण्यात आला आहे. साहित्य, संगीत आणि गझल क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय योगदानाची दखल घेत हा सन्मान प्रदान केला जाणार असल्याने साहित्यवर्तुळात आनंदाचे वातावरण निर्माण झाले (Pune Ghazal Program)आहे.

हा पुरस्कार वितरण सोहळा रविवार, दि. १९ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ११ वाजता अक्षरवेल सभागृह, रामबाग कॉलनी, सदाशिव पेठ, पुणे येथे संपन्न होणार आहे. कार्यक्रमासाठी साहित्य, संगीत आणि सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार असून रसिकांसाठी हा एक विशेष सांस्कृतिक मेळावा ठरणार (Pune Ghazal Program)आहे.

पुरस्काराचे वितरण ज्येष्ठ व्याख्याते व लेखक प्रा. मिलिंद जोशी यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार असून अमिता पैठणकर यांच्या साहित्यप्रवासाचा गौरव करण्यात येणार (Pune Ghazal Program) आहे.

या सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे पुरस्कार वितरणानंतर निमंत्रितांचे गझल संमेलनही रंगणार आहे. प्रसिद्ध कवयित्री व गझलप्रेमी प्रमा सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या गझल संमेलनात अनेक मान्यवर कवी-गझलकार सहभागी होणार आहेत. यात निश्चमा महाजन, वैजयंती आपटे, प्राजक्ता वेदपाठक, मुक्ता भुजबळे, वासंती वैद्य, ऋचा कर्वे आदी मान्यवरांचा सहभाग राहणार (Pune Ghazal Program) आहे.

कार्यक्रमाच्या आयोजनासाठी रंगत-संगत प्रतिष्ठानचे अध्यक्ष अॅड. प्रमोद आडकर, करम प्रतिष्ठानचे संस्थापक भूषण कटककर तसेच संयोजक मंडळातील कार्यकर्ते विशेष परिश्रम घेत आहेत. कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून पुणेकर रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले (Pune Ghazal Program)आहे.

अमिता पैठणकर यांना मिळणारा हा सन्मान केवळ त्यांच्या वैयक्तिक कार्याचा गौरव नसून मराठी गझल चळवळीला मिळालेली प्रेरणादायी दाद मानली जात आहे. त्यामुळे येत्या सोहळ्याकडे साहित्यप्रेमी आणि गझल रसिकांचे लक्ष लागले(Pune Ghazal Program) आहे.


Spread the love

Related posts

Ye Aankhen dekhkar:साठवणीतली गाणी पुष्प १८ : ये आँखें देखकर हम सारी दुनिया भूल जाते हैं…

Ujani Dam Project: प्रस्तावित प्रकल्पांविरोधात शेतकरी-कष्टकऱ्यांचा रास्ता रोको

Signature Park Society:डांगे चौकातील सिग्नेचर पार्कमध्ये आई-मुलाचा मृत्यू