Vikram Reddy Murder:रेड्डी कुटुंबीयांना पोलीस संरक्षणाची मागणी; सामूहिक आत्महत्येचा इशारा

Spread the love

(पिंपरी): विक्रम रेड्डी आणि रमेश रेड्डी यांच्या हत्या प्रकरणांशी संबंधित व्यक्तींकडून वारंवार धमक्या दिल्या जात असल्याचा आरोप रेड्डी कुटुंबीयांनी केला आहे. या धमक्यांची सखोल चौकशी करून कुटुंबीयांना पोलीस संरक्षण द्यावे आणि हत्या प्रकरणाचा खटला जलदगती न्यायालयात चालवावा, अशी मागणी गुरुवारी (दि. २२) आयोजित पत्रकार परिषदेत करण्यात आली. यावेळी व्यथा मांडताना कुटुंबीयांना अश्रू अनावर (Vikram Reddy Murder)झाले.

 

न्यायालयात जाताना तसेच अन्य ठिकाणी धमकावले जात असून, काही व्यक्तींकडून पाठलागही केला जात असल्याचा दावा कुटुंबीयांनी केला. बबलू रंगरेज, सफीर शेख, वाडी शेख, पप्पी शेख, समीर शेख आणि वेल्डिंगवाला उर्फ अरबाज शेख यांच्यासह संबंधित आरोपींच्या कुटुंबीयांकडून त्रास दिला जात असल्याचा आरोपही त्यांनी (Vikram Reddy Murder)केला.

 

या धमक्यांबाबत पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती दिली असून, देहूरोड पोलीस ठाण्यात दोन ते तीन वेळा तक्रारी दाखल केल्या आहेत. मात्र, पोलिसांकडून अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याची खंत कुटुंबीयांनी व्यक्त केली. हत्या प्रकरणातील आरोपींना जामीन मिळाल्यास पुन्हा भीतीचे वातावरण निर्माण होण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त(Vikram Reddy Murder) केली.

 

या प्रकरणाचा निष्पक्ष तपास करून दोषींना कठोर शिक्षा द्यावी, कुटुंबीयांना पोलीस संरक्षण द्यावे आणि खटला जलदगती न्यायालयात चालविण्यासाठी कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात आली. मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी तातडीने लक्ष घालून न्याय मिळवून द्यावा, असे आवाहनही कुटुंबीयांनी केले. अन्यथा देहूरोड येथील स्वामी विवेकानंद चौकात सामूहिक आत्महत्या करण्याचा इशारा त्यांनी (Vikram Reddy Murder)दिला.

 

या पत्रकार परिषदेला हेमलता रेड्डी, शारदा रेड्डी, सोनाली रेड्डी आणि नंदकुमार यादव उपस्थित (Vikram Reddy Murder)होते.


Spread the love

Related posts

Fort Building Competition 2026 : पिंपरी-चिंचवडमध्ये महापौर भव्य किल्ले बनवा स्पर्धा; पहिले बक्षीस ५१ हजार

Moshi Garbage Depot : मोशी कचरा डेपोच्या प्रश्नावर महेश लांडगे आक्रमक; शासनाकडे पाठपुरावा करणार

Sahitya Swanand Diwali Ank:सामाजिक सलोखा हे देशाचे बलस्थान – पद्मश्री गिरीश प्रभुणे