Samadhyatma poetry collection: समाध्यात्म काव्यसंग्रहाचे प्रकाशन; अध्यात्म ही आनंदवृत्ती : योगी निरंजनाथ

Spread the love

(पिंपरी, दि. २८) : ‘अध्यात्म ही आनंदवृत्ती आहे,’ असे प्रतिपादन आळंदी येथील श्री संत ज्ञानेश्वरमहाराज संस्थानचे प्रमुख विश्वस्त योगी निरंजनाथ गुरू शांतीनाथ यांनी (Samadhyatma poetry collection, )केले.

 

निगडी प्राधिकरण येथील स्व. दत्तोपंत म्हसकर सार्वजनिक विश्वस्त संस्थेच्या अरविंद-वृंदा सभागृहात रविवारी (दि. २७) ज्येष्ठ साहित्यिक राज अहेरराव लिखित ‘समाध्यात्म’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी योगी निरंजनाथ बोलत होते. जगद्गुरू तुकाराममहाराज यांचे वंशज ह. भ. प. अनिकेतमहाराज मोरे अध्यक्षस्थानी(Samadhyatma poetry collection)होते.

 

यावेळी स्व. दत्तोपंत म्हसकर सार्वजनिक विश्वस्त संस्थेचे अध्यक्ष प्रदीप पवार, सचिव मिलिंद कुलकर्णी, लेखक राज अहेरराव यांच्यासह पिंपरी-चिंचवडमधील साहित्यिक आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित (Samadhyatma poetry collection)होते.

 

योगी निरंजनाथ म्हणाले की, संपूर्ण विश्वाच्या कल्याणाचा विचार करणाऱ्या सनातन धर्मात भगवान शंकर हे शब्दांचे आद्यनिर्माते मानले जातात. भगवान श्रीकृष्णाने भगवद्गीतेच्या माध्यमातून कवींची परंपरा निर्माण केली. ज्ञानोबा-तुकोबांसह संतपरंपरेने ही परंपरा समृद्ध केली. त्याच परंपरेतून ‘समाध्यात्म’ या काव्यसंग्रहाच्या माध्यमातून कवीने समाजाशी अविरत संवाद साधण्याचा प्रयत्न केला आहे. संन्यस्तवृत्तीने समाजासाठी कार्यरत असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने हा काव्यसंग्रह प्रकाशित होत आहे, ही आनंदाची बाब(Samadhyatma poetry collection) आहे.

 

राज अहेरराव यांनी मनोगतात सांगितले की, आतापर्यंत विविध विषयांवर लेखन केले असून, गेल्या सुमारे दहा वर्षांपासून भगवद्गीतेने आपल्याला झपाटून टाकले. विविध धर्मग्रंथांचे वाचन केल्यानंतर त्यांचा सारांश म्हणजे भगवद्गीता असल्याची अनुभूती आली. प्रपंचात राहूनही अध्यात्मात रममाण होता येते. स्वतःच्या मूळ स्वरूपाचा शोध घेणे आणि समाज व संस्कृती यांचा समन्वय साधणे म्हणजेच अध्यात्म, अशी प्रचिती आल्याचे त्यांनी (Samadhyatma poetry collection)सांगितले.

 

तसेच, स्व. दत्तोपंत म्हसकर सार्वजनिक विश्वस्त संस्थेच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या दुर्बल साहित्यिकांचे दर्जेदार लेखन प्रकाशित केले जाईल, अशी ग्वाही अहेरराव यांनी(Samadhyatma poetry collection) दिली.

 

अनिकेतमहाराज मोरे यांनी अध्यक्षीय मनोगतात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि वारकरी संप्रदायाचा अनुबंध सुमारे शंभर वर्षांपासून अधिकाधिक दृढ होत असल्याचे सांगितले. संतविचारांची परंपरा जोपासणारा ‘समाध्यात्म’ हा काव्यसंग्रह कमी शब्दांत मोठा आशय व्यक्त करणारा असल्याचे त्यांनी नमूद(Samadhyatma poetry collection) केले.

 

दीपप्रज्वलन तसेच सरस्वती आणि अखंड भारतमाता यांच्या प्रतिमांचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. मिलिंद कुलकर्णी यांनी प्रास्ताविकात सेवा, वाङ्मय, समाजप्रबोधन आणि महिला विभाग या चार आयामांतून स्व. दत्तोपंत म्हसकर सार्वजनिक विश्वस्त संस्था कार्यरत असल्याची माहिती (Samadhyatma poetry collection)दिली.

 

कार्यक्रमाच्या आयोजनासाठी दत्तोपंत म्हसकर संस्था आणि नवयुग साहित्य व शैक्षणिक मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले. चैतन्य पंडित यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. डॉ. भाग्यश्री जोशी यांनी आभार मानले. सामुदायिक पसायदानाने कार्यक्रमाची सांगता (Samadhyatma poetry collection)झाली.


Spread the love

Related posts

Ye Aankhen dekhkar:साठवणीतली गाणी पुष्प १८ : ये आँखें देखकर हम सारी दुनिया भूल जाते हैं…

Ujani Dam Project: प्रस्तावित प्रकल्पांविरोधात शेतकरी-कष्टकऱ्यांचा रास्ता रोको

Signature Park Society:डांगे चौकातील सिग्नेचर पार्कमध्ये आई-मुलाचा मृत्यू