(पिंपरी-चिंचवड) : पिंपरी-चिंचवड शहर कलाप्रेमी मंचाच्या वतीने चिंचवड येथील तारांगण सभागृहात ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर आणि ज्येष्ठ अभिनेत्री मधू कांबीकर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी कलाकार, साहित्यिक आणि पत्रकारांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पद्मश्री गिरीश प्रभुणे (City Art Lovers Forum)होते.
मधू कांबीकर यांनी कोल्हाटी समाजातील मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी केलेल्या मदतीचे स्मरण करताना प्रभुणे म्हणाले, “मुलींनी नाचगाणी सोडून शिक्षण घ्यावे, यासाठी उभारत असलेल्या वसतिगृहाला मधू कांबीकर यांनी २५ हजार रुपयांची मदत केली. त्यामुळे सामाजिक समरसतेचा प्रवास पुढे नेण्यास मोठे बळ (City Art Lovers Forum)मिळाले.”
नाट्य परिषदेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांनी कलाकार त्यांच्या कलेतून आणि आठवणींतून कायम जिवंत राहतात, अशी भावना व्यक्त केली. ज्येष्ठ कलावंत वसंत अवसरीकर यांनी मधू कांबीकर यांच्यासोबत नाटक आणि चित्रपटांत काम करतानाचे अनुभव सांगितले. तसेच मधुताई आणि ज्येष्ठ अभिनेते निळू फुले यांच्या आठवणींनाही उजाळा(City Art Lovers Forum) दिला.
पत्रकार नंदकुमार सातुर्डेकर यांनी नाना पाटेकर यांच्या व्यक्तिमत्त्वातील बंडखोरपणा, विनोदबुद्धी आणि सामाजिक भान अधोरेखित केले. राजकीय नेत्यांना त्यांनी दिलेले परखड सल्ले आणि सामान्य माणसाच्या भावना व्यक्त करणारे त्यांचे प्रश्न यांचा उल्लेख करत नानांनी प्रत्येक भूमिका जीव ओतून साकारल्याचे ते (City Art Lovers Forum)म्हणाले.
दादा आढाव यांनी मधू कांबीकर यांच्यासोबतच्या शालेय जीवनातील आठवणी सांगितल्या, तर अश्विनी सातव यांनी दोन्ही कलाकारांच्या जीवनातून प्रेरणा घेऊन समाजात माणुसकी जपण्याचे आवाहन(City Art Lovers Forum) केले.
यावेळी लेखक प्रभाकर ओव्हाळ, काँग्रेसचे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे, सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर, निहाल पानसरे, साहित्य परिषदेचे अध्यक्ष राजन लाखे आदी उपस्थित होते. पत्रकार गोविंद वाकडे यांनी सूत्रसंचालन केले. पत्रकार व लेखक विजय जगताप यांनी प्रास्ताविक केले, तर अविनाश कांबीकर यांनी श्रद्धांजली अर्पण करून सभेचा समारोप (City Art Lovers Forum)केला.
कार्यक्रमाच्या आयोजनासाठी अनिल माने, प्रवीण तुपे, अनिस पठाण, विष्णू मांजरे, गणेश दिघे आणि नितीन भोगले यांनी पुढाकार(City Art Lovers Forum) घेतला.

