(पिंपरी-चिंचवड ): अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत खासदार निलेश लंके यांनी दणदणीत विजय मिळविल्याबद्दल त्यांच्यावर विविध स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत (Pcmc Ncp )आहे.
सामान्य जनतेशी नाळ जोडलेले नेतृत्व सहकार क्षेत्रात सक्रिय झाल्याने शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण आहे. त्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे प्रश्न प्राधान्याने मार्गी लागतील, तसेच सहकार क्षेत्रातील कारभार अधिक पारदर्शक होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात(Pcmc CNcp) आहे.
या विजयाबद्दल पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तसेच खासदार लंके यांच्या तरुण चाहत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी त्यांचे अभिनंदन (Pcmc Ncp )केले.
यावेळी इंजिनिअर सागर दिवटे, स्वप्निलशेठ गाढवे पाटील, उद्योजक संतोष दिवेकर आणि उद्योजक सिद्धार्थ देशमुख यांनी खासदार निलेश लंके यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील सामाजिक व राजकीय वाटचालीस शुभेच्छा(Pcmc Ncp ) दिल्या.
