Home माझं पिंपरी चिंचवड NavYug Diwali Sandhya 2026 : पारंपरिक काव्यप्रकारांच्या मैफलीने दिवाळीसांज रंगली

NavYug Diwali Sandhya 2026 : पारंपरिक काव्यप्रकारांच्या मैफलीने दिवाळीसांज रंगली

नवयुग साहित्य व शैक्षणिक मंडळ आणि स्व. दत्तोपंत म्हसकर सार्वजनिक विश्वस्त संस्थेच्या वतीने आयोजित ‘नवयुग दिवाळीसांज २०२६’ कार्यक्रमात पारंपरिक काव्यप्रकारांची सुरेल मैफल रंगली.

by Admin
Spread the love

(पिंपरी, दि. ५ नोव्हेंबर) : टाळ-मृदंग आणि तालवाद्यांच्या संगीतसाथीत सादर झालेल्या विविध पारंपरिक काव्यप्रकारांच्या श्रवणीय मैफलीने ‘नवयुग दिवाळीसांज २०२६’ हा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. नवयुग साहित्य व शैक्षणिक मंडळ आणि स्व. दत्तोपंत म्हसकर सार्वजनिक विश्वस्त संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी (दि. ४) आकुर्डीतील पांढारकरनगर येथील बीना इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला(NavYug Diwali Sandhya 2026) होता.

 

श्रीराम लोकसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुभाष पागळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या मैफलीचे निवेदन नवयुगचे अध्यक्ष राज अहेरराव यांनी केले. सुभाष चव्हाण यांच्या मंगलमय शंखवादनाने कार्यक्रमाची सुरुवात (NavYug Diwali Sandhya 2026)झाली.

 

यानंतर माधुरी विधाटे यांनी शारदास्तवन, प्रा. तुकाराम पाटील यांनी पाळणा, आय. के. शेख यांनी जोगवा, राजेंद्र पगारे आणि संपत शिंदे यांनी अभंग, उमा इनामदार, राजेंद्र घावटे आणि रेणुका हजारे यांनी भक्तिगीते सादर केली. वंदना इन्नाणी आणि चंद्रकांत धस यांनी गवळण, सविता इंगळे यांनी लोकगीत, अनिकेत गुहे यांनी गीत, तर अश्विनी कुलकर्णी, उज्ज्वला केळकर आणि माधुरी ओक यांनी भारूड सादर केले. सुरेश कंक यांनी योगगीत, पुरुषोत्तम हिंगणकर यांनी भक्तिरचना, तर जितेंद्र राय यांनी नज्म सादर करून मैफलीत वैविध्यपूर्ण रंग (NavYug Diwali Sandhya 2026)भरले.

 

शाहीर आसराम कसबे यांनी ‘मायमराठीची शिकवण’ या लोकगीताचे दमदार सादरीकरण करून मैफलीचा समारोप केला. सर्व कलाकारांच्या सादरीकरणाला उपस्थित रसिकांनी उत्स्फूर्त दाद (NavYug Diwali Sandhya 2026)दिली.

 

यावेळी स्व. दत्तोपंत म्हसकर संस्थेचे अध्यक्ष प्रदीप पवार, सचिव मिलिंद कुलकर्णी, पी. बी. शिंदे, प्रकाश ननावरे, नेहा कुलकर्णी यांच्यासह शहरातील साहित्य, सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी किसनमहाराज चौधरी आणि कविवर्य अनिल दीक्षित यांचा प्रातिनिधिक सत्कार करण्यात(NavYug Diwali Sandhya 2026) आला.

 

प्रास्ताविकात नंदकुमार मुरडे यांनी नवयुग साहित्य व शैक्षणिक मंडळाच्या, तर किरण कुलकर्णी यांनी स्व. दत्तोपंत म्हसकर संस्थेच्या कार्याची माहिती दिली. अध्यक्षीय मनोगतात सुभाष पागळे यांनी साहित्यिकांनी पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व अधोरेखित करणारे लेखन करावे, असे आवाहन (NavYug Diwali Sandhya 2026)केले.

 

राजेंद्र घावटे यांनी सूत्रसंचालन केले, तर अरविंद वाडकर यांनी आभार मानले. सामुदायिक पसायदान आणि उपस्थितांना दिवाळी फराळाचे वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात (NavYug Diwali Sandhya 2026)आली.

 


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00