Home तंत्रज्ञान Pimpri Dairy Farm Flyover : डेअरी फार्म रेल्वे उड्डाणपुलाचे लोकार्पण; वाहतूक कोंडीतून दिलासा

Pimpri Dairy Farm Flyover : डेअरी फार्म रेल्वे उड्डाणपुलाचे लोकार्पण; वाहतूक कोंडीतून दिलासा

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते पिंपरी डेअरी फार्म रेल्वे उड्डाणपुलाचे लोकार्पण आणि ल क्षेत्रीय कार्यालयाच्या नव्या इमारतीचे भूमिपूजन. ६५.२८ कोटींच्या पुलामुळे रेल्वे फाटकावरील प्रतीक्षा संपणार.

by Admin
Spread the love

(पिंपरी, दि. ५ नोव्हेंबर ): पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतूक व्यवस्था अधिक सुरळीत करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या पिंपरी डेअरी फार्म येथील रेल्वे उड्डाणपुलाचे लोकार्पण आणि महापालिकेच्या ल क्षेत्रीय कार्यालयाच्या नूतन इमारतीचे भूमिपूजन राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते गुरुवारी करण्यात आले. महापौर रवी लांडगे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम (Pimpri Dairy Farm Flyover)झाला.

 

यावेळी आमदार उमा खापरे, अमित गोरखे, उपमहापौर शर्मिला बाबर, माजी महापौर योगेश बहल, महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, आरपीआय गटनेते कुणाल वाव्हळकर, नगरसदस्य जितेंद्र ननावरे, कुशाग्र कदम, संदीप वाघेरे, डब्बू आसवानी, पंकज भालेकर, विराज लांडे, धर्मपाल तंतरपाळे, नगरसदस्या संगीता ताम्हाणे, भीमाताई फुगे, मनीषा लांडे, वर्षा जगताप, निकिता कदम, प्रियांका कुदळे, प्रतीक्षा जवळकर, सारिका मासुळकर, अरुणा लंघोटे उपस्थित (Pimpri Dairy Farm Flyover)होते.

 

तसेच अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे, सहशहर अभियंता अजय सूर्यवंशी, माजी नगरसदस्य राजेंद्र जगताप, शाम लांडे, माजी नगरसदस्या सीमा सावळे, सुनीता वाघेरे, सुजाता पालांडे, आशा शेंडगे, उपायुक्त अण्णा बोदडे, अतुल पाटील, विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांच्यासह महापालिका अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक उपस्थित (Pimpri Dairy Farm Flyover)होते.

 

रेल्वे फाटकावरील प्रतीक्षा संपणार

 

पिंपरी डेअरी फार्म येथील उड्डाणपुलामुळे मुंबई-पुणे रेल्वे मार्गावरील रेल्वे फाटक क्रमांक ६० बंद होणार असून, वाहनचालकांना फाटक उघडण्याची प्रतीक्षा करावी लागणार नाही. दापोडी-निगडी रस्त्यावरून पिंपरी गावात जाणाऱ्या नागरिकांचा प्रवास विनाअडथळा होणार आहे. त्यामुळे वेळ, श्रम आणि इंधनाची बचत होण्यास मदत होणार(Pimpri Dairy Farm Flyover) आहे.

 

पिंपरी, पिंपळे सौदागर आणि रहाटणी परिसरातील नागरिकांना दापोडी-निगडी रस्त्याकडे जाण्यासाठी हा पर्यायी मार्ग उपयुक्त ठरणार आहे. तसेच शगुन चौक, साई चौक आणि इंदिरा गांधी पुलावरील वाहतुकीचा ताण कमी होण्यास मदत होणार आहे. संत तुकारामनगर मेट्रो स्टेशनपर्यंत पोहोचण्यासाठीही नागरिकांना सोयीचा मार्ग उपलब्ध होणार(Pimpri Dairy Farm Flyover) आहे.

 

६५.२८ कोटींचा उड्डाणपूल

 

या प्रकल्पासाठी ६५.२८ कोटी रुपयांची निविदा मंजूर करण्यात आली होती. पुलाची एकूण लांबी ५६५ मीटर आणि रुंदी १७.२ मीटर आहे. रेल्वे मार्गावरील व्हायाडक्टची लांबी ४५ मीटर, तर रेल्वे स्पॅन वगळता व्हायाडक्टची लांबी २४० मीटर आहे. पुलाच्या दोन्ही बाजूंना पोहोच रस्ते आणि सेवा रस्ते विकसित करण्यात आले आहेत. वाहनचालकांसह पादचाऱ्यांसाठी पदपथांचीही व्यवस्था करण्यात आली (Pimpri Dairy Farm Flyover)आहे.

 

या प्रकल्पासाठी संरक्षण मंत्रालय, भारत सरकार यांच्याकडून ५.९६ एकर जमीन जुलै २०२२ मध्ये महापालिकेकडे हस्तांतरित करण्यात आली होती. त्यानंतर आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून पुलाचे काम करण्यात(Pimpri Dairy Farm Flyover) आले.

 

ल क्षेत्रीय कार्यालयाला मिळणार सुसज्ज इमारत

 

महापालिकेच्या ल क्षेत्रीय कार्यालयाच्या नूतन इमारतीचे भूमिपूजनही यावेळी करण्यात आले. या क्षेत्रीय कार्यालयामार्फत परिसरातील नागरिकांना नागरी सुविधा, तक्रार निवारण आणि विविध प्रशासकीय सेवा दिल्या जातात. नव्या इमारतीमुळे प्रशासकीय कामकाजासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध होऊन नागरिकांना सेवा देण्याची प्रक्रिया अधिक सुलभ होणार (Pimpri Dairy Farm Flyover)आहे.

 

महापौर रवी लांडगे म्हणाले…

 

पिंपरी-चिंचवड शहराचा विस्तार आणि वाहनांची संख्या वाढत असल्याने नागरिकांना वाहतूक कोंडीमुक्त, सुरक्षित व सोयीस्कर प्रवास उपलब्ध करून देणे महापालिकेचे प्राधान्य आहे. डेअरी फार्म येथील रेल्वे उड्डाणपूल दैनंदिन प्रवासातील अडथळा दूर करणार आहे. या पुलामुळे परिसरातील व्यापार, उद्योग आणि दैनंदिन व्यवहारांनाही चालना मिळेल, असे महापौर रवी लांडगे यांनी (Pimpri Dairy Farm Flyover)सांगितले.

 

आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी म्हणाले…

 

शहराच्या भविष्यातील वाहतुकीचा विचार करून पायाभूत सुविधांचे नियोजन करण्यात येत आहे. डेअरी फार्म उड्डाणपुलाच्या रचनेत वाहनचालकांसह पादचाऱ्यांच्या सुविधांचाही विचार केला आहे. या पुलामुळे शगुन चौक, साई चौक आणि पिंपरी पुलावरील वाहतुकीचा ताण कमी होण्यास मदत होईल. रेल्वे फाटकामुळे होणारा विलंब टळल्याने वेळेची बचत होऊन वाहतूक अधिक सुरळीत होईल, असे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी (Pimpri Dairy Farm Flyover)सांगितले.

 

 


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00