Home गुन्हे Maruti Bapkar House Arrest:मारुती भापकरांना पोलिसांनी नजरकैदेत ठेवल्याचा आरोप; सरकार आणि पोलीस प्रशासनाचा निषेध

Maruti Bapkar House Arrest:मारुती भापकरांना पोलिसांनी नजरकैदेत ठेवल्याचा आरोप; सरकार आणि पोलीस प्रशासनाचा निषेध

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्र्यांना जनहिताच्या प्रश्नांवर निवेदन देण्यापासून पोलिसांनी रोखल्याचा आरोप मारुती भापकर यांनी केला. नजरकैदेच्या कारवाईचा त्यांनी निषेध केला.

by Admin
Spread the love

(पिंपरी, दि. ३ नोव्हेंबर २०२६) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार यांच्या पुणे-पिंपरी चिंचवड दौऱ्यादरम्यान पोलिसांनी आपल्याला सकाळपासून नजरकैदेत ठेवल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी केला आहे. विविध जनहिताच्या प्रश्नांबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यापासून रोखल्याचा आरोप करत त्यांनी राज्य सरकार आणि पोलीस प्रशासनाचा जाहीर निषेध केला (Maruti Bapkar House Arrest)आहे.

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुणे मेट्रोचे उद्घाटन आणि पिंपरी चिंचवड पोलीस मुख्यालयाच्या भूमिपूजन कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांचा दौरा आयोजित करण्यात आला होता. या वेळी रायगड जिल्ह्यातील टोरंट जलविद्युत प्रकल्पासाठी होणारी वृक्षतोड, उजनी धरण परिसरातील प्रस्तावित एआय, तरंगता सौर ऊर्जा, हायड्रोजन व अणुऊर्जा प्रकल्पांना शेतकरी, शेतमजूर आणि मच्छीमारांचा विरोध, तसेच मोशीतील वेस्ट एनर्जी प्रकल्पातील ८ जुलै २०२६ रोजीची दुर्घटना आणि महापालिकेतील कथित भ्रष्टाचाराबाबतची पत्रे व पुरावे मुख्यमंत्र्यांना द्यायचे होते, असे भापकर यांनी निवेदनात म्हटले (Maruti Bapkar House Arrest)आहे.

 

मात्र, मंगळवारी सकाळी आठ वाजता पोलीस अधिकारी व कर्मचारी आपल्या घरी आले आणि दौऱ्याच्या काळात पोलिसांसोबत राहावे लागेल, असे सांगून आपल्याला नजरकैदेत ठेवल्याचा आरोप त्यांनी केला. या काळात दोन ठिकाणी अंत्यविधीसाठी पोलिस बंदोबस्तात नेण्यात आले. त्यानंतर दुपारी दोन वाजता पिंपरी पोलीस ठाण्यात आणण्यात आले. सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत पोलीस ठाण्यात बसवून ठेवल्यानंतर सोडण्यात आल्याचे त्यांनी म्हटले (Maruti Bapkar House Arrest)आहे.

 

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना जनहिताच्या प्रश्नांबाबत निवेदन देण्याची विनंती करूनही पोलिसांनी त्याची व्यवस्था केली नाही, असा आरोप भापकर यांनी केला. लोकशाही व्यवस्थेत नागरिकांना आपल्या प्रश्नांबाबत राज्याच्या प्रमुखांना निवेदन देण्यापासून रोखणे निषेधार्ह असून, अशा प्रकारे आवाज दाबण्याचा प्रयत्न खपवून घेतला जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला(Maruti Bapkar House Arrest) आहे.

 

 

 

 


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00