Home माझं पिंपरी चिंचवड Sandeep Jadhav Death : निर्मल वारी अभियानाचे प्रवर्तक संदीप जाधव यांचे निधन

Sandeep Jadhav Death : निर्मल वारी अभियानाचे प्रवर्तक संदीप जाधव यांचे निधन

by Admin
Spread the love

(पिंपरी-चिंचवड) : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत कार्यकारिणी सदस्य आणि ‘निर्मल वारी’ अभियानाचे प्रमुख प्रवर्तक संदीप शिवाजी जाधव (वय ५३) यांचे बुधवारी (दि. ४) पहाटे अंदमान येथे निधन झाले. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याशी संबंधित ऐतिहासिक सेल्युलर जेलला भेट देत असताना त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनामुळे सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात हळहळ व्यक्त होत(Sandeep Jadhav Death) आहे.

 

संत तुकारामनगर येथील रहिवासी असलेले जाधव हे कल्याण जनता सहकारी बँकेत पुणे विभागीय प्रमुख म्हणून कार्यरत होते. व्यावसायिक जबाबदारी सांभाळतानाच त्यांनी सामाजिक आणि संघटनात्मक कार्यासाठी स्वतःला वाहून घेतले होते. बालपणापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जोडले गेलेल्या जाधव यांनी शाखा स्तरापासून प्रांत स्तरापर्यंत विविध जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडल्या. संघाच्या घोष पथकातील कुशल वादक म्हणूनही त्यांची ओळख होती. सध्या ते पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे मुख्य मार्ग प्रमुख संयोजक म्हणून कार्यरत (Sandeep Jadhav Death)होते.

 

‘निर्मल वारी’ अभियानाच्या माध्यमातून आषाढी वारीला स्वच्छतेची जोड देण्याचे महत्त्वपूर्ण काम त्यांनी उभे केले. पंढरपूरच्या वारीत स्वच्छतेचा संदेश रुजवण्याबरोबरच वारी हगणदारीमुक्त करण्यासाठी त्यांनी नियोजनबद्ध पद्धतीने सातत्याने प्रयत्न केले. या अभियानाच्या उभारणीतील त्यांचे योगदान विशेष उल्लेखनीय मानले(Sandeep Jadhav Death) जाते.

 

पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील अनेक सामाजिक व सांस्कृतिक संस्थांच्या उभारणीतही त्यांचा सक्रिय सहभाग होता. पिंपरी-चिंचवडमधील ढोल-ताशा महासंघाच्या निर्मितीत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. संघटन कौशल्य, संयमी स्वभाव आणि कार्यकर्त्यांना सोबत घेऊन काम करण्याची हातोटी यामुळे विविध क्षेत्रांत त्यांनी आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली (Sandeep Jadhav Death)होती.

 

त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुली आणि भाऊ असा परिवार आहे. त्यांच्यावर गुरुवारी (दि. ५) सकाळी ९.३० वाजता नेहरूनगर स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार (Sandeep Jadhav Death)आहेत.

 

जाधव यांच्या अकाली निधनाने सामाजिक बांधिलकी जपणारा, संघटनात्मक कार्यात सातत्य ठेवणारा आणि स्वच्छता व सांस्कृतिक चळवळींसाठी समर्पित असलेला कार्यकर्ता हरपल्याची भावना व्यक्त होत(Sandeep Jadhav Death) आहे.


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00