(प्राधिकरण, निगडी) : प्राधिकरण ज्येष्ठ नागरिक संघाच्या इतिहासात प्रथमच आयोजित करण्यात आलेली ‘दिवाळी पहाट’ सुरेल गीतांच्या मैफलीने उत्साहात संपन्न झाली. बुधवार, दि. ४ नोव्हेंबर रोजी सकाळी सहा वाजता आयोजित या कार्यक्रमात प्राधिकरण परिसरातील नामवंत गायक-गायिकांनी विविध गीतप्रकार सादर करून उपस्थित रसिकांना मंत्रमुग्ध (Pradhikaran Senior Citizens)केले.
श्रीनिवास ठोंबरे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या सांगीतिक मैफलीत भूपाळी ते भैरवी असा सुरेल प्रवास अनुभवायला मिळाला. भक्तिगीते, भावगीते, भजने, नाट्यगीते, अभंग, गवळणी, कोळीगीते यांसह हिंदी चित्रपटगीतांचाही समावेश(Pradhikaran Senior Citizens) होता.
‘उठी श्रीरामा पहाट झाली’, ‘विठू माऊली तू माऊली जगाची’, ‘आली माझ्या घरी ही दिवाळी’, ‘लिंबलोण उतरू कशी’, ‘तुझे गीत गाण्यासाठी’, ‘हे सुरांनो चंद्र व्हा’, ‘यमुनेच्या तीरावर पाहिला हरी’, ‘धुंदी कळ्यांना धुंदी फुलांना’, ‘तुझ्या गळा माझ्या गळा’ यांसारख्या मराठी गीतांसोबतच ‘फूल तुम्हे भेजा है खत में’, ‘तेरी बिंदिया रे’, ‘दिल तो पागल है’ या हिंदी गीतांनी मैफलीत रंग भरला. या गीतांच्या सुरेल सादरीकरणामुळे उपस्थितांची सकाळ संगीतमय आणि आनंददायी (Pradhikaran Senior Citizens)झाली.
या मैफलीत सहभागी झालेल्या शीतल कुलकर्णी, शुभांगी म्हेत्रे, स्वाती शितुरकर, अंजली जोशी, शिवाजी जक्का, सुभाष बोरोले, मनोहर जोशी, विजय सहारे आणि श्रीनिवास ठोंबरे या कलाकारांचा यथोचित सत्कार करण्यात(Pradhikaran Senior Citizens) आला.
यावेळी संघाच्या अद्ययावत सभासद यादीचे प्रकाशन निर्देशिका समितीचे प्रमुख मुकुंद जोशी यांच्या हस्ते करण्यात आले. संघाच्या कामकाजात सुसूत्रता आणण्यासाठी आणि सभासदांमधील संपर्क अधिक दृढ करण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरेल, असे मत संघाचे अध्यक्ष चंद्रशेखर जोशी यांनी व्यक्त(Pradhikaran Senior Citizens) केले.
या कार्यक्रमाला संघाचे माजी अध्यक्ष, पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्य आणि सभासद मोठ्या संख्येने उपस्थित (Pradhikaran Senior Citizens)होते.
