(पुनावळे) : पिंपरी-चिंचवडचे ज्येष्ठ पत्रकार आणि कवी बाबू डिसोजा यांना त्यांच्या सातत्यपूर्ण सामाजिक कार्याची आणि सामाजिक जाणीवेतून केलेल्या निरपेक्ष योगदानाची दखल घेऊन ‘अनुरव साहित्य गौरव पुरस्कार २०२६’ जाहीर झाला (Anurav Sahitya Gaurav)आहे.
कलानुरव कल्याणकारी सामाजिक संस्था, आनंदनगर, पुणे यांच्या वतीने अनुरव साहित्य कला, क्रीडा अकादमीमार्फत स्व. लक्ष्मणराव कल्याणकर आणि स्व. गुंडेराव कुलकर्णी यांच्या स्मरणार्थ हा पुरस्कार दिला जातो. कर्तव्यनिष्ठा आणि सृजनशील प्रतिभेचा गौरव म्हणून बाबू डिसोजा यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली (Anurav Sahitya Gaurav)आहे.
संस्थेच्या अध्यक्षा अनुजा कल्याणकर आणि सचिव लता कुलकर्णी यांनी पुनावळे येथील त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन निवडीचे पत्र सुपूर्द केले. यावेळी त्यांनी डिसोजा यांचे अभिनंदन (Anurav Sahitya Gaurav)केले.
या पुरस्काराचे स्वरूप ११ हजार रुपये रोख, पुणेरी पगडी आणि शाल असे आहे. एका भव्य कार्यक्रमात त्यांना हा पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात येणार (Anurav Sahitya Gaurav)आहे.
बाबू डिसोजा यांना पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल पिंपरी-चिंचवडमधील साहित्यिक आणि विविध साहित्य संस्थांच्या प्रतिनिधींनी दूरध्वनीद्वारे तसेच प्रत्यक्ष भेटून त्यांचे अभिनंदन (Anurav Sahitya Gaurav)केले.
