Home माझं पिंपरी चिंचवड Netaji Mankar: ज्येष्ठ पत्रकार नेताजी मानकर यांचे निधन; वयाच्या ६७व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Netaji Mankar: ज्येष्ठ पत्रकार नेताजी मानकर यांचे निधन; वयाच्या ६७व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

ज्येष्ठ पत्रकार, खेळाडू आणि सामाजिक कार्यकर्ते नेताजी दशरथ मानकर यांचे वयाच्या ६७व्या वर्षी निधन झाले. दैनिक प्रभातमध्ये बातमीदार म्हणून काम केलेल्या मानकर यांनी ‘संस्कृती’ साप्ताहिक आणि ऑनलाइन पत्रकारितेतही योगदान दिले.

by Admin
Spread the love

(पिंपरी ): ज्येष्ठ पत्रकार, खेळाडू आणि सामाजिक कार्यकर्ते नेताजी दशरथ मानकर (वय ६७) यांचे गुरुवारी (दि. २२) दुपारी बिर्ला हॉस्पिटल येथे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे. उद्योजक हर्षल आणि अनिकेत मानकर यांचे ते वडील (Netaji Mankar)होत.

 

मानकर यांनी दैनिक प्रभातमध्ये अनेक वर्षे बातमीदार म्हणून काम केले. निवृत्तीनंतर त्यांनी ‘संस्कृती’ हे साप्ताहिक सुरू केले. तसेच ‘टू द पॉईंट्स डॉट ऑर्ग’ या न्यूज पोर्टलच्या माध्यमातून ऑनलाइन पत्रकारिताही (Netaji Mankar)केली.

 

वाकड परिसराच्या विकासात त्यांचे योगदान होते. शिवसेनेचे कार्यकर्ते आणि खेळाडू म्हणूनही ते परिचित होते. विविध सामाजिक उपक्रमांत त्यांचा सक्रिय सहभाग (Netaji Mankar)असे.

 

त्यांच्यावर कस्पटेवस्ती, वाकड येथील स्मशानभूमीत गुरुवारी सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पत्रकारिता, क्रीडा, सामाजिक, राजकीय क्षेत्रांसह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित (Netaji Mankar)होते.


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00