(पिंपरी-चिंचवड) : स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी (दि. ४) झालेल्या साप्ताहिक सभेत शहरातील विविध विकासकामे, रस्ते, आरोग्य सुविधा, नागरी सोयी-सुविधा आणि पायाभूत प्रकल्पांशी संबंधित प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली. तसेच आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंना आर्थिक साहाय्य देण्यासही मान्यता देण्यात (PCMC Standing Committee)आली.
महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीतील दिवंगत महापौर मधुकरराव रामचंद्र पवळे सभागृहात ही सभा (PCMC Standing Committee)झाली.
क्रीडा क्षेत्रातील प्रांशु सदाशिव सूर्यवंशी याला इजिप्त येथील ज्युनिअर वर्ल्ड कप, साजिद करीम तांबोळी व अन्वर मुक्तार अन्सारी यांना सिंगापूर येथील आंतरराष्ट्रीय दिव्यांग क्रिकेट स्पर्धा, प्रणीत गणेश आढाव याला हाँगकाँग येथील आंतरराष्ट्रीय योगासन स्पर्धा आणि स्नेहा एस. कमलदिन्नी हिला आशियाई पॉवरलिफ्टिंग स्पर्धेसाठी आर्थिक मदत व शिष्यवृत्ती देण्यास मंजुरी देण्यात आली. प्रगती गायकवाड हिलाही क्रीडा प्रमाणपत्र पडताळणीनंतर ‘हिंद केसरी’ स्पर्धेसाठी आर्थिक साहाय्य देण्यास मान्यता (PCMC Standing Committee)मिळाली.
आरोग्य सुविधांच्या बळकटीकरणासाठी महापालिका रुग्णालयांकरिता अत्याधुनिक वॉशिंग मशीन खरेदी, नवीन भोसरी व जिजामाता रुग्णालयांसाठी ७८ प्रकारची वैद्यकीय पुस्तके खरेदी आणि जिजामाता रुग्णालयातील सी-आर्म व एक्स-रे मशीनची यंत्रणा दुरुस्त करून कार्यान्वित करण्यास मंजुरी देण्यात आली. तसेच सीएसआर व सीईआर उपक्रमांसाठी नियुक्त सल्लागाराला मुदतवाढ आणि सावित्रीबाई फुले अकादमीच्या संचालकपदाला मुदतवाढ देण्यास मान्यता देण्यात (PCMC Standing Committee)आली.
शहरातील विविध प्रभागांतील रस्त्यांचे डांबरीकरण, हॉटमिक्स पद्धतीने दुरुस्ती, पेव्हिंग ब्लॉक, पाथवे काँक्रिटीकरण, नाले व स्टॉर्म वॉटर लाईनची दुरुस्ती, महापालिका इमारती आणि स्वच्छतागृहांची देखभाल अशा कामांच्या निविदांना मंजुरी देण्यात आली. यामध्ये चिखली, मोशी, डुडुळगाव, चऱ्होली, वडमुखवाडी, चोविसावाडी, खराळवाडी, कामगारनगर, यशवंतनगर, उद्यमनगर, प्रेमलोक पार्क, दळवीनगर, इंदिरानगर, धावडेवस्ती, गुळवेवस्ती, भगतवस्ती, चक्रपाणी वसाहत, सद्गुरुनगर आणि लांडगेवस्ती परिसरातील कामांचा समावेश(PCMC Standing Committee) आहे.
चिखली सेक्टर १७ व १९ मधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या गृहप्रकल्पातील सीमाभिंत आणि प्रधानमंत्री आवास योजनेतील इमारतींची उर्वरित दुरुस्ती, जुनी सांगवीतील इंद्रप्रस्थ परिसरातील नाल्याची दिशा बदलणे व घाटाचे सुशोभीकरण, तसेच एम्पायर इस्टेट नाल्याच्या दुरुस्तीच्या कामांनाही मंजुरी देण्यात (PCMC Standing Committee)आली.
शहरातील १०० गणेश विसर्जन स्थळांवर निर्माल्य संकलनासाठी कलश खरेदी व वितरणाला कार्योत्तर मंजुरी देण्यात आली. याशिवाय विविध प्रभागांतील मंडप व्यवस्था, विद्युतविषयक कामे, तळवडे स्मशानभूमीची देखभाल, रस्त्यांवरील नामफलक व रोड फर्निचर बसविणे यांसह अन्य कामांचे प्रस्तावही मंजूर करण्यात(PCMC Standing Committee) आले.
सभेत विविध विभागांशी संबंधित अन्य प्रशासकीय आणि तांत्रिक प्रस्तावांवरही निर्णय घेण्यात(PCMC Standing Committee) आले.
