Photography Exhibition:अभिजात मराठी भाषा सप्ताहातील छायाचित्रकारांचा सन्मान; प्रदर्शनाला ४ हजारांहून अधिक भेटी

Spread the love

(पिंपरी, दि. १५) : अभिजात मराठी भाषा सप्ताहानिमित्त पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आणि पुणे श्रमिक पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित छायाचित्र प्रदर्शनात उत्कृष्ट छायाचित्रे सादर करणाऱ्या पाच माध्यम छायाचित्रकारांचा सन्मान करण्यात आला.

 

चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात झालेल्या समारोपीय कार्यक्रमात ‘सकाळ’चे रितेश छब्रिबन, ‘सामना’चे दत्ता अडागळे, ‘लोकमत’चे अतुल मारवाडी, ‘महाराष्ट्र टाइम्स’चे सचिन फुलसुंदर आणि ‘पुढारी’चे मिलिंद कांबळे यांना सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले.

 

यावेळी महापालिकेचे विशेष अधिकारी तथा मराठी भाषा समन्वय अधिकारी किरण गायकवाड, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, प्रेक्षागृहाचे व्यवस्थापक विकास वेताळ, पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश शेळके, सरचिटणीस हिरा सरवदे, उपाध्यक्ष किशोर बारकूले आणि सदस्य तुषार झरेकर यांच्यासह पत्रकार व नागरिक उपस्थित होते.

 

छायाचित्रांच्या माध्यमातून सामाजिक, सांस्कृतिक आणि सार्वजनिक जीवनातील विविध पैलू उलगडणाऱ्या या प्रदर्शनातून माध्यम छायाचित्रकारांच्या कलात्मक दृष्टिकोनाचा अनुभव नागरिकांना घेता आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र कुंभार आणि सुहास जोशी यांनी केले.

 

अभिजात मराठी भाषा सप्ताहानिमित्त ३ ते ९ ऑक्टोबरदरम्यान आयोजित या छायाचित्र प्रदर्शनाला चार हजारांहून अधिक नागरिकांनी भेट दिली. छायाचित्रकारांनी टिपलेले विविध क्षण, घटना आणि प्रसंग पाहण्याची संधी नागरिकांना मिळाली. प्रदर्शनाला मिळालेल्या प्रतिसादातून छायाचित्रकलेविषयीची उत्सुकता दिसून आली.


Spread the love

Related posts

Ye Aankhen dekhkar:साठवणीतली गाणी पुष्प १८ : ये आँखें देखकर हम सारी दुनिया भूल जाते हैं…

Ujani Dam Project: प्रस्तावित प्रकल्पांविरोधात शेतकरी-कष्टकऱ्यांचा रास्ता रोको

Signature Park Society:डांगे चौकातील सिग्नेचर पार्कमध्ये आई-मुलाचा मृत्यू