Anup More Foundation:निगडी येथे दिवाळी पहाटसाठी गाणार अनुराधा पौडवाल

Spread the love

(पिंपरी, ता. ४) : दिवाळीच्या मंगलमय पहाटेला सुरेल संगीताची मेजवानी अनुभवण्याची संधी निगडीकर रसिकांना मिळणार आहे. अनुप मोरे सोशल अँड स्पोर्ट्स फाउंडेशनच्या वतीने शनिवार, दि. ७ नोव्हेंबर रोजी पहाटे ५.३० वाजता निगडी प्राधिकरणातील सेक्टर २७ अ येथील नियोजित महापौर निवास मैदानावर ‘दिवाळी पहाट २०२६’ या विशेष सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल यांची विशेष उपस्थिती हे या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरणार(Anup More Foundation) आहे.

 

या संगीत सोहळ्यात मराठी व हिंदी चित्रपटगीतांसह भावगीते आणि भक्तिगीतांची सुरेल मैफल रंगणार आहे. अनुराधा पौडवाल यांच्या सुमधुर आवाजातील ‘माई नी माई’, ‘दिल है कि मानता नहीं’, ‘तू मेरा जानू है’ यांसारख्या लोकप्रिय गीतांचा आनंद रसिकांना घेता येणार (Anup More Foundation)आहे.

 

माजी उपमहापौर व नगरसेविका शैलजा अविनाश मोरे, भारतीय जनता युवा मोर्चाचे माजी प्रदेशाध्यक्ष अनुप शैलजा अविनाश मोरे आणि अनुप मोरे सोशल अँड स्पोर्ट्स फाउंडेशनचे उपाध्यक्ष समीर शैलजा अविनाश मोरे यांच्या पुढाकारातून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले(Anup More Foundation) आहे.

 

दिवाळीच्या पहाटे सुरेल गीतांचा आनंद घेत सणाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले (Anup More Foundation)आहे.


Spread the love

Related posts

U-19 Asia Cup: आर्यवीर सहवागची नेपाळविरुद्ध तुफानी खेळी; ३४ चेंडूंत अर्धशतक

Vivek Samvad Diwali Ank 2026 : मुकुंद संगोराम यांच्या उपस्थितीत ‘विवेक संवाद’ दिवाळी अंकाचे शानदार प्रकाशन

Statue of Hindubhushan : मोशीतील स्टॅच्यू ऑफ हिंदूभूषण १००१ दिव्यांनी उजळला; संभाजी महाराजांना दीपोत्सवातून मानवंदना