Gondan Diwali Ank:कुलस्वामिनी प्रतिष्ठानच्या ‘गोंदण’ दिवाळी अंकाचे चिंचवडमध्ये थाटात प्रकाशन

Spread the love

(आळंदी) :शब्दांचे गोंदण मनावर कोरत साहित्याची सेवा करणाऱ्या *कुलस्वामिनी प्रतिष्ठान, पुणे *तर्फे प्रकाशित ‘गोंदण’ दीपावली विशेषांक २०२६ (वर्ष १३ वे)चा प्रकाशन सोहळा विज्ञान केंद्र (सायन्स पार्क), इंदिरानगर, चिंचवड येथे मोठ्या उत्साहात आणि साहित्यिक वातावरणात संपन्न (Gondan Diwali Ank) झाला.

 

या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून स्नेहालय संस्था, अहिल्यानगरचे विश्वस्त *शशिकांत सातभाई* उपस्थित होते, तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान उपविभागीय अधिकारी (से.नि.) व तिळवण तेली समाज, पुणेचे विश्वस्त **अनिल लक्ष्मण घाटकर* यांनीGondan Diwali Ank) भूषविले.

 

*मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन व पुरस्कार वितरण*

 

प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते ‘गोंदण’ दिवाळी अंकाचे प्रकाशन करण्यात आले. त्यानंतर प्रतिष्ठानतर्फे आयोजित राज्यस्तरीय कथा, कविता व लेख स्पर्धेतील विजेत्यांना प्रथम, द्वितीय, तृतीय व उत्तेजनार्थ पुरस्कार प्रदान करून मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात Gondan Diwali Ank ) आले.

 

*संस्कृतीचा ठेवा आणि वाचन संस्कृतीचे महत्त्व*

 

प्रमुख पाहुणे शशिकांत सातभाई यांनी आपल्या मनोगतात, ‘गोंदण’सारखे दिवाळी अंक हे आपल्या संस्कृतीचा ठेवा असून, वाचन संस्कृती जपून ठेवण्यासाठी ते अत्यंत मोलाचे आहेत, असे प्रतिपादन Gondan Diwali Ank) केले

 

अध्यक्षीय भाषणात अनिल घाटकर यांनी, प्रतिष्ठानच्या १३ वर्षांच्या यशस्वी सामाजिक आणि साहित्यिक वाटचालीचे विशेष कौतुक केले

 

 

*दिवाळी अंकाची वैशिष्ट्ये*

 

‘गोंदण’च्या या वर्षीच्या विशेषांकात ह.भ.प. प्रशांत महाराज मोरे, डॉ. श्रीपाल सबनीस, हेमांगी बोंडे, राजेंद्र घावटे, डॉ. संजय अहिरे यांसह अनेक नामवंत लेखकांचे चतुरस्त्र आणि वैविध्यपूर्ण लेखन लाभले आहे.

 

*मान्यवरांचे सहकार्य*

 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक **बापूसाहेब जाधव** यांनी केले, तर संपादकीय मनोगत **प्राचार्य पांडुरंग गाडीलकर** यांनी मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन **डॉ. चांगदेव पिंगळे** यांनी व आभार प्रदर्शन **डॉ. नंदकुमार माळशिरसकर** यांनी केले.

 


Spread the love

Related posts

Ye Aankhen dekhkar:साठवणीतली गाणी पुष्प १८ : ये आँखें देखकर हम सारी दुनिया भूल जाते हैं…

Ujani Dam Project: प्रस्तावित प्रकल्पांविरोधात शेतकरी-कष्टकऱ्यांचा रास्ता रोको

Signature Park Society:डांगे चौकातील सिग्नेचर पार्कमध्ये आई-मुलाचा मृत्यू