Yog Swasthya : भाऊसाहेब गायकवाड लिखित ‘योग स्वास्थ्य’ पुस्तकाचे प्रकाशन

Spread the love

(पिंपरी, दि. १९) : आजच्या धकाधकीच्या जीवनात निरोगी व निरामय आयुष्य जगण्यासाठी योगसाधना आवश्यक आहे, असे प्रतिपादन जानकीदेवी बजाज ग्रामविकास सामाजिक संस्थेचे संस्थापक विश्वास सोहोनी यांनी(Yog Swasthya) केले.

 

थेरगाव येथील खिंवसरा पाटील शिक्षण संकुलात रविवारी (दि. १८ ऑक्टोबर) योगाध्यापक भाऊसाहेब गायकवाड लिखित ‘योग स्वास्थ्य’ या पुस्तकाचे प्रकाशन झाले. या वेळी सोहोनी बोलत होते. योगसाधना आत्मसात करण्यासाठी जीवनशैलीत आवश्यक बदल करण्याची मानसिकता महत्त्वाची असून, नियमित योगाभ्यासासाठी हे पुस्तक उपयुक्त ठरेल, असे त्यांनी(Yog Swasthya) सांगितले.

 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी योगशिक्षक सुभाष चव्हाण होते. ज्येष्ठ साहित्यिक सुरेश कंक, लोकमान्य टिळक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सुनीता घोडे, प्रकाशिका सुप्रिया ऐनापुरे, वंदना गायकवाड आणि लेखक भाऊसाहेब गायकवाड उपस्थित (Yog Swasthya)होते.

 

आहार, विहार, निद्रा आणि योगासनांची सांगड घातल्यास निरोगी व दीर्घायुषी जीवन जगता येते, असे मत सुरेश कंक यांनी व्यक्त केले. गायकवाड यांनी गेल्या सुमारे २५ वर्षांपासून योगसाधनेच्या प्रचार-प्रसारासाठी कार्यरत असल्याचे सांगितले. २००८ मध्ये प्रकाशित झालेल्या ‘सुलभ योगसाधना’ या पुस्तकाला मिळालेल्या प्रतिसादानंतर ‘योग स्वास्थ्य’ हे पुस्तक लिहिल्याचे त्यांनी नमूद(Yog Swasthya) केले.

 

सुभाष चव्हाण यांनी गायकवाड यांच्या प्रदीर्घ अनुभवातून साकारलेले हे पुस्तक वाचकांसाठी मार्गदर्शक ठरेल, असा विश्वास व्यक्त केला. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वतीपूजन, शंखवादन आणि स्वागतगीताने झाली. प्रदीप गांधलीकर यांनी सूत्रसंचालन केले, तर शामराव सरकाळे यांनी आभार(Yog Swasthya) मानले.


Spread the love

Related posts

Ye Aankhen dekhkar:साठवणीतली गाणी पुष्प १८ : ये आँखें देखकर हम सारी दुनिया भूल जाते हैं…

Ujani Dam Project: प्रस्तावित प्रकल्पांविरोधात शेतकरी-कष्टकऱ्यांचा रास्ता रोको

Signature Park Society:डांगे चौकातील सिग्नेचर पार्कमध्ये आई-मुलाचा मृत्यू