India vs New Zealand 5th T20: भारताचा न्यूझीलंडकडून ७ गडी राखून पराभव

Spread the love

(हॅमिल्टन ): भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाचव्या टी-२० सामन्यात न्यूझीलंडने भारताचा ७ गडी राखून पराभव केला. भारताने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ८ बाद १९१ धावा केल्या. प्रत्युत्तरात न्यूझीलंडने १८ षटकांत ३ बाद १९५ धावा करीत विजय मिळवला.अर्थात किवी संघासाठी हा विजय म्हणजे वरातीमागून घोडे असाच प्रकार आहे, भारतीय संघाने ही मालिका 3/2 अशी जिंकली (IND vs NZ T20)आहे.

 

भारताकडून इशान किशनने आक्रमक फलंदाजी करत ३२ चेंडूंत ६१ धावा ठोकल्या. त्यात पाच चौकार आणि पाच षटकारांचा समावेश होता. कर्णधार श्रेयस अय्यरने २३ चेंडूंत ५० धावांची तडाखेबंद खेळी केली. त्याने तीन चौकार आणि चार षटकार मारले. नमन धीरने २३ चेंडूंत ३३, तर नितीश कुमार रेड्डीने १७ चेंडूंत २२ धावा केल्या. अन्य फलंदाजांना मोठी खेळी करता आली नाही. न्यूझीलंडकडून अॅडम मिल्नेने १९ धावांत चार बळी घेतले, तर ब्लेअर टिकनर आणि नॅथन स्मिथ यांनी प्रत्येकी दोन बळी (IND vs NZ T20)मिळवले.

 

१९२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडने आक्रमक सुरुवात केली. टीम सेफर्टने भारतीय गोलंदाजांवर जोरदार हल्ला चढवत ५० चेंडूंत ९३ धावा केल्या. त्याच्या खेळीत ११ चौकार आणि पाच षटकारांचा समावेश होता. ग्लेन फिलिप्सने नाबाद ३८ चेंडूंत ६५ धावा करीत त्याला उत्तम साथ दिली. डॅरेल मिचेलने १६ चेंडूंत २९ धावा केल्या. सेफर्ट आणि फिलिप्स यांच्या आक्रमक फलंदाजीमुळे न्यूझीलंडने अवघ्या १८ षटकांत लक्ष्य (IND vs NZ T20)गाठले.

 

भारताकडून अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती आणि नितीश कुमार रेड्डी यांनी प्रत्येकी एक बळी घेतला. मात्र, भारतीय गोलंदाजांना धावांचा वेग रोखण्यात अपयश (IND vs NZ T20)आले.

बऱ्याच कालावधीनंतर पुनरागमन करणाऱ्या भुवनेश्वर कुमारसाठी ही मालिका खूप निराशाजनक (IND vs NZ T20)ठरली.

 

यजमान संघाच्या ऍडम मिलनेला सामनावीर म्हणून तर फिलिप्सला मालिकावीर म्हणून गौरवण्यात (IND vs NZ T20)आले.


Spread the love

Related posts

Ye Aankhen dekhkar:साठवणीतली गाणी पुष्प १८ : ये आँखें देखकर हम सारी दुनिया भूल जाते हैं…

Dnyandeep School Kabaddi:ज्ञानदीप विद्यालयाच्या मुली विभागीय कबड्डी स्पर्धेत विजेत्या; राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

Ind vs Nz 3rd T20I:अभिषेक शर्मा, वैभव सूर्यवंशीचा धमाका; भारताचा ६ विकेट्सनी विजय