Dnyandeep School Kabaddi:ज्ञानदीप विद्यालयाच्या मुली विभागीय कबड्डी स्पर्धेत विजेत्या; राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

Spread the love

(पिंपरी-चिंचवड) : सांगोला, जिल्हा सोलापूर येथे दि. २४ व २५ ऑक्टोबर रोजी पार पडलेल्या शालेय विभागीय कबड्डी क्रीडा स्पर्धेत १४ वर्षांखालील मुलींच्या गटात रुपीनगर, तळवडे येथील ज्ञानदीप माध्यमिक विद्यालयाच्या संघाने शानदार कामगिरी करत विभागीय विजेतेपद पटकावले. अंतिम सामन्यात पुणे शहर संघाचा पराभव करून या संघाने राज्यस्तरीय स्पर्धेत आपले स्थान निश्चित(Dnyandeep School Kabaddi) केले.

 

या स्पर्धेचे उद्घाटन महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालयाचे क्रीडा उपसंचालक युवराज नाईक, सोलापूर जिल्हा क्रीडा अधिकारी प्रकाश मोहारे, क्रीडा अधिकारी वैशाली दरवडे आणि तालुका क्रीडा अधिकारी सचिन रणदिवे यांच्या हस्ते (Dnyandeep School Kabaddi)झाले.

 

स्पर्धेच्या उपांत्य फेरीत ज्ञानदीप विद्यालयाच्या संघाने अहिल्यानगर शहर संघाचा ३३-९ असा २४ गुणांनी पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम सामन्यातही ज्ञानदीपच्या मुलींनी आपला दबदबा कायम राखत पुणे शहर संघाचा ४५-१६ असा २९ गुणांनी दणदणीत पराभव (Dnyandeep School Kabaddi)केला.

 

या विजयात अष्टपैलू खेळाडू आराध्या भोसले, उन्नती बाटले आणि कल्याणी नेमाणे यांनी उत्कृष्ट चढाया केल्या. तर सई भोसले, पायल बांगर आणि प्रियंका भालेराव यांनी भक्कम पकडी करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. स्नेहल खोत, श्रावणी काळे, आर्या चव्हाण, संस्कृती सवासे, आरोही कारे आणि धनश्री बहादुरगे यांनीही उत्कृष्ट साथ (Dnyandeep School Kabaddi)दिली.

 

या विजयानंतर ज्ञानदीप विद्यालयाच्या संघाची दि. १ ते ५ डिसेंबरदरम्यान मुंबई येथे होणाऱ्या १४ वर्षांखालील शालेय राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी निवड झाली(Dnyandeep School Kabaddi) आहे.

 

ज्ञानदीप माध्यमिक विद्यालय संस्थेचे अध्यक्ष सुधाकर दळवी, सचिव सूर्यकांत भसे आणि विद्यालयाचे प्राचार्य सुनील गारगोटे यांनी विजयी खेळाडूंचे अभिनंदन करून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. संघाला ऋषिकेश बेलदार आणि ज्येष्ठ कबड्डी मार्गदर्शक भगवान सोनवणे यांनी मार्गदर्शन केले. या यशासाठी श्री रमेश हिवरे आणि सौ. नीला मुकुळ यांचे सहकार्य (Dnyandeep School Kabaddi)लाभले.

 

 


Spread the love

Related posts

Sahitya Swanand Diwali Ank:सामाजिक सलोखा हे देशाचे बलस्थान – पद्मश्री गिरीश प्रभुणे

Pratibha College Chinchwad :प्रतिभा महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून वात्सल्य संस्थेसाठी ४,५०० मेणबत्ती पाकिटांचे पॅकिंग

South Africa vs Australia: दक्षिण आफ्रिकेचा ऐतिहासिक विजय! ऑस्ट्रेलियाला १७६ धावांनी नमवत मालिका जिंकली