Pratibha College Chinchwad :प्रतिभा महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून वात्सल्य संस्थेसाठी ४,५०० मेणबत्ती पाकिटांचे पॅकिंग

Spread the love

(चिंचवड, दि. २) : दिवाळीचा आनंद गरजूंपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने चिंचवड येथील कमला एज्युकेशन सोसायटी संचलित प्रतिभा कॉलेज ऑफ कॉमर्स अँड कॉम्प्युटर स्टडीजच्या विद्यार्थ्यांनी सामाजिक बांधिलकी जपत स्तुत्य उपक्रम राबविला. विद्यार्थी विकास समिती, राष्ट्रीय सेवा योजना आणि प्रतिभा ज्युनिअर कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने देहूगाव येथील वात्सल्य मतिमंद, निराधार मुले व महिला निवासी शाळेसाठी विद्यार्थ्यांनी ४,५०० मेणबत्ती पाकिटांचे पॅकिंग(Pratibha College Chinchwad) केले.

विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जबाबदारी, सहानुभूती आणि समाजसेवेची भावना रुजविण्यासाठी संस्थेतर्फे नियमितपणे अशा समाजाभिमुख उपक्रमांचे आयोजन केले जाते. भविष्यातही गरजेनुसार सामाजिक बांधिलकीतून असे उपक्रम राबविण्यात येतील, असे संस्थेचे संस्थापक सचिव डॉ. दीपक शहा यांनी(Pratibha College Chinchwad) सांगितले.

संस्थेचे संस्थापक सचिव डॉ. दीपक शहा, खजिनदार डॉ. भूपाली शहा आणि संचालिका डॉ. तेजल शहा यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम आयोजित करण्यात आला. दिवाळीच्या आनंदात विशेष घटकांना सहभागी करून घेत त्यांच्या दैनंदिन गरजांसाठी हातभार लावणे, हा या उपक्रमामागील उद्देश (Pratibha College Chinchwad)होता.

या उपक्रमात महाविद्यालयाच्या वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. एकोप्याने आणि शिस्तबद्ध पद्धतीने मेणबत्ती पाकिटांचे पॅकिंग पूर्ण करत विद्यार्थ्यांनी संघभावना, सेवाभाव आणि सामाजिक जबाबदारीचे दर्शन घडविले. या उपक्रमाबद्दल वात्सल्य संस्थेच्या संस्थापिका वृशाली देवतरासे यांनी कमला एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक सचिव डॉ. दीपक शहा, प्राचार्य, प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांचे विशेष आभार (Pratibha College Chinchwad)मानले

कार्यक्रमाचे संयोजन विद्यार्थी विकास समितीच्या प्रमुख प्रा. ज्योती इंगळे, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. सुकलाल कुंभार, प्रा. सुप्रिया गायकवाड, प्रा. रोहित आकोलकर आणि अन्य प्राध्यापकांनी (Pratibha College Chinchwad)केले.


Spread the love

Related posts

Sahitya Swanand Diwali Ank:सामाजिक सलोखा हे देशाचे बलस्थान – पद्मश्री गिरीश प्रभुणे

Ye Aankhen dekhkar:साठवणीतली गाणी पुष्प १८ : ये आँखें देखकर हम सारी दुनिया भूल जाते हैं…

Ujani Dam Project: प्रस्तावित प्रकल्पांविरोधात शेतकरी-कष्टकऱ्यांचा रास्ता रोको