South Africa vs Australia: दक्षिण आफ्रिकेचा ऐतिहासिक विजय! ऑस्ट्रेलियाला १७६ धावांनी नमवत मालिका जिंकली

Spread the love

(केपटाऊन ): टेम्बा बावुमाच्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिकेने बलाढ्य ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच नव्हे, तर दक्षिण आफ्रिकेच्या मायभूमीवर धूळ चारत तीन सामन्यांची कसोटी मालिका २-१ अशी जिंकली. मालिकेतील पहिला सामना गमावल्यानंतर दमदार पुनरागमन करत आफ्रिकेने सलग दोन कसोटी जिंकण्याचा पराक्रम केला. तिसऱ्या कसोटीत दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियावर १७६ धावांनी मात (South Africa vs Australia)केली. 

 

दक्षिण आफ्रिकेच्या या विजयाचा पाया चौथ्या दिवशी रचला गेला. रायन रिकेल्टन आणि वियान मुल्डर यांनी जबरदस्त कसोटी टेम्परामेंट दाखवत ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचा धैर्याने सामना केला. दोघांनी शतके झळकावत सहाव्या विकेटसाठी १५४ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. त्यांच्या खेळीमुळे अडचणीत सापडलेल्या आफ्रिकन संघाने दुसऱ्या डावात ३८७ धावा उभारत ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी २८८ धावांचे लक्ष्य (South Africa vs Australia)ठेवले.

 

पाचव्या आणि अखेरच्या दिवशी ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, कागिसो रबाडाने सुरुवातीलाच दोन धक्के देत कांगारूंना बॅकफूटवर ढकलले. त्यानंतर सायमन हार्मरच्या फिरकीने ऑस्ट्रेलियन फलंदाजीचे कंबरडे मोडले. हार्मरने अवघ्या १६ धावांत सहा बळी टिपत ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव १११ धावांत गुंडाळला. दक्षिण आफ्रिकेने १७६ धावांनी दणदणीत विजय मिळवत मालिकेवर कब्जा (South Africa vs Australia)केला.

 

विशेष म्हणजे पहिली कसोटी २१४ धावांनी गमावल्यानंतर दक्षिण आफ्रिकेने दुसरी कसोटी एक डाव आणि ३१ धावांनी जिंकली होती. त्यानंतर निर्णायक तिसऱ्या कसोटीतही विजय मिळवत मालिकेत २-१ अशी बाजी (South Africa vs Australia)मारली.

 

या ऐतिहासिक विजयामुळे दक्षिण आफ्रिकेने आयसीसी कसोटी क्रमवारीत ऑस्ट्रेलियाला मागे टाकत अव्वल स्थान पटकावले. मात्र, जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेत दक्षिण आफ्रिका दुसऱ्या, तर न्यूझीलंड पहिल्या स्थानावर(South Africa vs Australia) आहे.

बलाढ्य ऑस्ट्रेलियाविरुद्ध पिछाडीवरून केलेले पुनरागमन, रिकेल्टन-मुल्डर यांची जिगरबाज फलंदाजी आणि हार्मरची फिरकी हे दक्षिण आफ्रिकेच्या ऐतिहासिक मालिका विजयाचे प्रमुख शिल्पकार(South Africa vs Australia) ठरले.

 

 


Spread the love

Related posts

Dnyandeep School Kabaddi:ज्ञानदीप विद्यालयाच्या मुली विभागीय कबड्डी स्पर्धेत विजेत्या; राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

India vs New Zealand 4th T20: भारताचा ८७ धावांनी पराभव; ग्लेन फिलिप्सचे वादळी शतक

Cricket World: श्रीलंकेचा विक्रमी पाठलाग; दक्षिण आफ्रिकेचा ऑस्ट्रेलियावर ऐतिहासिक विजय