(पुणे) : ज्येष्ठ मराठी अभिनेत्री आणि लावणी कलावंत मधु कांबीकर यांचे वयाच्या ७३ व्या वर्षी निधन झाले. पुण्यात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या अनेक वर्षांपासून त्या आजाराशी झुंज देत होत्या. त्यांच्या निधनाने मराठी चित्रपटसृष्टीसह लावणी क्षेत्रावर शोककळा पसरली (Madhu Kambikar Death)आहे.
२८ जुलै १९५३ रोजी बीड जिल्ह्यातील माळेगाव खुर्द येथे जन्मलेल्या मधु कांबीकर यांनी तमाशाच्या फडातून आपल्या कलाप्रवासाला सुरुवात केली. पुढे चित्रपट, लोकनाट्य, व्यावसायिक रंगभूमी आणि दूरदर्शन मालिकांमध्ये त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांच्या ‘शापित’ चित्रपटातून त्यांच्या अभिनयाची विशेष दखल घेतली (Madhu Kambikar Death)गेली.
‘हेच माझं माहेर’, ‘राघुमैना’, ‘एक होता विदूषक’, ‘झपाटलेला’, ‘डेबू’ आणि ‘येऊ का घरात’ यांसारख्या चित्रपटांतील त्यांच्या भूमिका गाजल्या. विशेषतः आई आणि सासूच्या व्यक्तिरेखांमधून त्यांनी प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले. लावणीतील सहजसुंदर सादरीकरण आणि अभिनयातील नैसर्गिकता ही त्यांची वैशिष्ट्ये (Madhu Kambikar Death)होती.
२७ नोव्हेंबर २०१६ रोजी मुंबईतील माटुंगा येथील यशवंत नाट्यमंदिरात ‘लावण्य संगीत’ कार्यक्रमात नृत्य सादर करताना त्यांना पक्षाघाताचा झटका आला. त्यानंतर त्यांची प्रकृती खालावत गेली आणि त्यांना अभिनय क्षेत्रापासून दूर राहावे (Madhu Kambikar Death)लागले.
२०१८ मध्ये मधु कांबीकर यांना झी चित्र गौरव पुरस्कार सोहळ्यात जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला होता. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्या पुरस्कार स्वीकारण्यासाठी उपस्थित राहू शकल्या नाहीत. त्यांच्या वतीने सून शीतल जाधव यांनी पुरस्कार स्वीकारला होता. त्यांच्या निधनाने मराठी मनोरंजनविश्वातील एक ज्येष्ठ आणि प्रतिभावान कलावंत हरपली (Madhu Kambikar Death)आहे.
