Home माझं पिंपरी चिंचवड PCMC 0 Waste Office:पिंपरी-चिंचवड महापालिकेत ‘शून्य कचरा कार्यालय’ उपक्रम सुरू

PCMC 0 Waste Office:पिंपरी-चिंचवड महापालिकेत ‘शून्य कचरा कार्यालय’ उपक्रम सुरू

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या झोपडपट्टी पुनर्वसन व निर्मूलन विभागात ‘शून्य कचरा कार्यालय’ उपक्रमाचा शुभारंभ. कचरा वर्गीकरण, पुनर्वापर आणि कौशल्यम लाईटहाऊसच्या रोजगाराभिमुख प्रशिक्षणावर भर.

by Admin
Spread the love

(पिंपरी, दि. १२ ऑक्टोबर) : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त झोपडपट्टी पुनर्वसन व निर्मूलन विभागाच्या वतीने ‘शून्य कचरा कार्यालय’ उपक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. चिंचवड येथील विभागाच्या मुख्य कार्यालयात अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम आणि विक्रांत बगाडे यांच्या हस्ते या उपक्रमाचे उद्घाटन झाले. कार्यालयीन स्तरावर कचऱ्याचे वर्गीकरण, पुनर्वापर आणि योग्य विल्हेवाटीला प्रोत्साहन देणे, हा या उपक्रमाचा उद्देश आहे. महापालिकेच्या इतर कार्यालयांतही ही संकल्पना राबविण्यात येईल, असे अतिरिक्त आयुक्तांनी (PCMC 0 Waste Office)सांगितले.

 

यावेळी अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम आणि विक्रांत बगाडे यांनी उपक्रमाचे महत्त्व अधोरेखित केले. शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेता कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन ही सामूहिक जबाबदारी आहे. प्रत्येक कार्यालयाने स्वतःपासून सुरुवात करून कचऱ्याचे वर्गीकरण आणि पुनर्वापराला प्राधान्य दिल्यास या समस्येवर मात करण्यास मदत होईल, असे जंगम यांनी (PCMC 0 Waste Office)सांगितले.

 

झोपडपट्टी पुनर्वसन व निर्मूलन विभागाचे उप आयुक्त अण्णा बोदडे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. याअंतर्गत काच, रद्दी कागद, धातू, स्वच्छ पॉलिथिन, प्लास्टिक आणि ई-कचरा संकलनासाठी स्वतंत्र डबे ठेवण्यात आले आहेत. ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून सेंद्रिय खतनिर्मितीसाठी ऑरगॅनिक कंपोस्ट ड्रमचीही व्यवस्था करण्यात आली (PCMC 0 Waste Office)आहे.

 

महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीपासून शून्य कचरा संकल्पनेच्या विस्ताराला सुरुवात करण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असे अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे यांनी सांगितले. कार्यालयीन स्तरावर कचऱ्याचे विलगीकरण, पुनर्वापर आणि टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ वस्तू तयार करण्याला प्रोत्साहन दिल्यास कर्मचाऱ्यांसह नागरिकांमध्येही जागरूकता वाढेल, असे ते (PCMC 0 Waste Office)म्हणाले.

 

कौशल्यम लाईटहाऊस प्रकल्पाची पाहणी

 

या कार्यक्रमानंतर अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम आणि विक्रांत बगाडे यांनी चिंचवड येथील कौशल्यम लाईटहाऊस प्रकल्पाला भेट देऊन प्रशिक्षण उपक्रमांची पाहणी केली. शहरात दहा ठिकाणी लाईटहाऊस प्रकल्प सुरू असून, युवकांना त्यांच्या आवडीनुसार विविध अभ्यासक्रमांचे मोफत प्रशिक्षण दिले जात आहे. ग्राफिक डिझायनिंग, डिजिटल मार्केटिंग, कृत्रिम बुद्धिमत्ता, व्हिडिओ एडिटिंग आणि मोशन ग्राफिक्स यांसारख्या आधुनिक अभ्यासक्रमांमुळे युवकांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होऊ शकतात, असे जंगम यांनी नमूद (PCMC 0 Waste Office)केले.

 

परदेशातील रोजगाराच्या संधींचा विचार करून परदेशी भाषा आणि रोजगाराभिमुख कौशल्यांचे प्रशिक्षण देण्याची गरजही त्यांनी व्यक्त (PCMC 0 Waste Office)केली.

 

प्रशिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष रोजगार मिळतो की नाही, याचा नियमित आढावा घेणे आवश्यक असल्याचे बगाडे यांनी सांगितले. दर तीन महिन्यांनी विद्यार्थ्यांच्या रोजगारस्थितीचे सर्वेक्षण करून त्यांच्या अडचणी जाणून घ्याव्यात. नर्सिंग आणि हॉटेल व्यवसायासारख्या क्षेत्रांतील मनुष्यबळाची मागणी लक्षात घेऊन प्रशिक्षणाचे नियोजन केल्यास युवकांसाठी रोजगाराच्या अधिक संधी निर्माण होऊ शकतात, असेही त्यांनी स्पष्ट(PCMC 0 Waste Office) केले.

 

उप आयुक्त अण्णा बोदडे यांनी सांगितले की, कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना विश्वासात घेऊन शून्य कचरा कार्यालयाची संकल्पना राबविण्यात येत आहे. दैनंदिन कामकाजात कचऱ्याचे वर्गीकरण, पुनर्वापर आणि योग्य विल्हेवाटीची सवय रुजविण्यावर भर दिला जात आहे. या उपक्रमातून स्वच्छ, सुंदर आणि हरित पिंपरी-चिंचवडच्या उद्दिष्टाला हातभार लावण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी नमूद (PCMC 0 Waste Office)केले.

 

यावेळी उप आयुक्त अण्णा बोदडे, सहाय्यक आयुक्त दशरथ कांबळे, कार्यकारी अभियंता शेखर गुरव, आसरा फाऊंडेशनच्या अध्यक्षा अर्चना मोरे, कौशल्यम लाईटहाऊस प्रकल्पाच्या व्यवस्थापक अमृता बहुलेकर, आयपीसीएचे प्रतिनिधी दत्ता हेंद्रे, वैभव नसुरडे, आशिष कुंभलकर, महापालिका कर्मचारी आणि प्रकल्पातील प्रशिक्षणार्थी उपस्थित (PCMC 0 Waste Office)होते.

 

शून्य कचरा कार्यालय म्हणजे काय?

 

कार्यालयात निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे वर्गीकरण, पुनर्वापर आणि पुनर्प्रक्रिया करून अंतिम विल्हेवाटीसाठी पाठविण्यात येणाऱ्या कचऱ्याचे प्रमाण कमीत कमी ठेवणे, हा शून्य कचरा कार्यालय संकल्पनेचा उद्देश आहे. या उपक्रमांतर्गत काच, रद्दी कागद, धातू, पॉलिथिन, प्लास्टिक आणि ई-कचऱ्यासाठी स्वतंत्र संकलन व्यवस्था करण्यात आली आहे. ओल्या कचऱ्यापासून सेंद्रिय खतनिर्मितीची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली (PCMC 0 Waste Office)आहे.


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00