Pimpri Dairy Farm Flyover :पिंपरी डेअरी फार्म रेल्वे उड्डाणपुलाचे लोकार्पण; वाहतूक कोंडीतून मिळणार दिलासा

Spread the love

(पिंपरी-चिंचवड) : शहरातील वाहतूक व्यवस्था अधिक गतिमान आणि सुरळीत करण्याच्या दृष्टीने पिंपरी डेअरी फार्म येथील नव्याने उभारण्यात आलेल्या रेल्वे उड्डाणपुलाचे लोकार्पण तसेच ‘ल’ क्षेत्रीय कार्यालयाच्या नूतन इमारतीचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते करण्यात (Pimpri Dairy Farm Flyover)आले.

 

महापौर रवी लांडगे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला आमदार उमा खापरे, अमित गोरखे, उपमहापौर शर्मिला बाबर, महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्यासह लोकप्रतिनिधी आणि अधिकारी उपस्थित(Pimpri Dairy Farm Flyover) होते.

 

या उड्डाणपुलामुळे मुंबई-पुणे रेल्वे मार्गावरील रेल्वे फाटक क्रमांक ६० बंद होणार असून, दापोडी-निगडी मार्गावरून पिंपरी गावात जाणाऱ्या तसेच पिंपळे सौदागर आणि रहाटणी परिसरातील नागरिकांचा प्रवास अधिक जलद आणि विनाअडथळा होणार आहे. तसेच शगुन चौक आणि इंदिरा गांधी पुलावरील वाहतुकीचा ताण कमी होऊन संत तुकारामनगर मेट्रो स्थानकापर्यंत पोहोचणे सोयीचे होणार (Pimpri Dairy Farm Flyover)आहे.

 

उड्डाणपुलासाठी ६५ कोटी २८ लाख रुपये खर्च झाला असून, त्याची लांबी ५६५ मीटर आणि रुंदी १७.२ मीटर आहे. पुलाच्या दोन्ही बाजूंना सेवा रस्ते आणि पादचाऱ्यांसाठी पदपथ उभारण्यात आले आहेत. या प्रकल्पासाठी संरक्षण मंत्रालयाकडून जुलै २०२२ मध्ये ५.९६ एकर जागा महापालिकेकडे हस्तांतरित करण्यात आली (Pimpri Dairy Farm Flyover)होती.

 

या दोन्ही प्रकल्पांमुळे शहरातील पायाभूत सुविधा अधिक सक्षम होण्यासह नागरिकांचा दैनंदिन प्रवास अधिक सुखकर होईल, असा विश्वास महापौर रवी लांडगे आणि आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी व्यक्त (Pimpri Dairy Farm Flyover)केला.

 


Spread the love

Related posts

U-19 Asia Cup: आर्यवीर सहवागची नेपाळविरुद्ध तुफानी खेळी; ३४ चेंडूंत अर्धशतक

Vivek Samvad Diwali Ank 2026 : मुकुंद संगोराम यांच्या उपस्थितीत ‘विवेक संवाद’ दिवाळी अंकाचे शानदार प्रकाशन

Statue of Hindubhushan : मोशीतील स्टॅच्यू ऑफ हिंदूभूषण १००१ दिव्यांनी उजळला; संभाजी महाराजांना दीपोत्सवातून मानवंदना