Waste to Energy Project: कचऱ्यापासून वीजनिर्मिती प्रकल्प रद्द करा; शैलजाताई मोरे यांची मागणी

Spread the love

(पिंपरी-चिंचवड) : रावेत, प्राधिकरण आणि आकुर्डी सेक्टर २३ येथे प्रस्तावित कचऱ्यापासून वीजनिर्मिती प्रकल्पाला स्थानिक नागरिकांचा तीव्र विरोध असून, हा प्रकल्प कायमस्वरूपी रद्द करावा, अशी मागणी माजी उपमहापौर तथा नगरसेविका शैलजाताई अविनाश मोरे यांनी पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडे (Waste to Energy Project)केली.

 

प्रस्तावित प्रकल्पामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य, पिण्याच्या पाण्याची सुरक्षितता, दुर्गा टेकडीचे पर्यावरण, जैवविविधता तसेच शैक्षणिक व निवासी वातावरणावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असल्याची चिंता मोरे यांनी व्यक्त केली. रावेत, प्राधिकरण आणि आकुर्डी परिसरातील नागरिकांच्या हिताचा विचार करून प्रकल्पाची प्रक्रिया तातडीने थांबवावी, अशी आग्रही मागणी त्यांनी (Waste to Energy Project)केली.

 

शहराच्या विकासाला आणि कचरा व्यवस्थापनाला विरोध नसून, नागरिकांचे आरोग्य व पर्यावरण धोक्यात घालून विकास होता कामा नये, अशी भूमिका शैलजाताई मोरे यांनी मांडली. शहरातील कचरा समस्येवर उपाय म्हणून कचऱ्याचे उगमस्थानी वर्गीकरण, पुनर्वापर, बायोमिथेनेशन आणि विकेंद्रित कचरा प्रक्रिया यांसारख्या पर्यावरणपूरक पर्यायांना प्राधान्य देण्याची सूचनाही त्यांनी(Waste to Energy Project) केली.

 

यावेळी उपमहापौर शर्मिलाताई बाबर, राजू बाबर, नगरसेवक राजू मिसाळ, नगरसेवक अमित गावडे, माजी महापौर आर. एस. कुमार आणि समीर मोरे उपस्थित (Waste to Energy Project)होते.

 

नागरिकांच्या हरकती, परिसराचे पर्यावरणीय महत्त्व आणि सार्वजनिक आरोग्याचा विचार करून महापालिकेने योग्य निर्णय घ्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. दुर्गा टेकडीचे संवर्धन आणि भावी पिढ्यांसाठी स्वच्छ व सुरक्षित पर्यावरण राखण्याच्या दृष्टीने प्रस्तावित प्रकल्प रद्द करण्याची मागणी नागरिकांच्या वतीने करण्यात (Waste to Energy Project)आली.

 


Spread the love

Related posts

Fort Building Competition 2026 : पिंपरी-चिंचवडमध्ये महापौर भव्य किल्ले बनवा स्पर्धा; पहिले बक्षीस ५१ हजार

Moshi Garbage Depot : मोशी कचरा डेपोच्या प्रश्नावर महेश लांडगे आक्रमक; शासनाकडे पाठपुरावा करणार

Sahitya Swanand Diwali Ank:सामाजिक सलोखा हे देशाचे बलस्थान – पद्मश्री गिरीश प्रभुणे