Home माझं पिंपरी चिंचवड प्रतिभा ज्युनिअर कॉलेजमध्ये गांधी जयंती; विद्यार्थ्यांचा स्वच्छतेचा संकल्प

प्रतिभा ज्युनिअर कॉलेजमध्ये गांधी जयंती; विद्यार्थ्यांचा स्वच्छतेचा संकल्प

चिंचवडच्या प्रतिभा ज्युनिअर कॉलेजमध्ये महात्मा गांधी जयंतीनिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन; विद्यार्थ्यांनी स्वच्छता, शिस्त आणि सामाजिक जबाबदारीचा सामूहिक संकल्प केला.

by Admin
Spread the love

(चिंचवड, दि. ३) : चिंचवड येथील कमला एज्युकेशन सोसायटी संचलित प्रतिभा ज्युनिअर कॉलेजमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. सत्य, अहिंसा, शांतता, साधेपणा आणि स्वच्छता या महात्मा गांधी यांच्या विचारांचे स्मरण करून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकी, शिस्त आणि स्वच्छतेविषयी जनजागृती करण्यात आली.

 

महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस प्राचार्या डॉ. वनिता कुऱ्हाडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी अभिवादन करून स्वच्छता, शिस्त, शांतता आणि सामाजिक जबाबदारी या मूल्यांचे पालन करण्याचा सामूहिक संकल्प केला. “तुम्हाला जगात जो बदल पहावयाचा आहे, तो बदल स्वतःपासून सुरू करा,” या विचारातून विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्यात आली.

 

या उपक्रमाचे आयोजन सोशल वेल्फेअर कमिटीचे डॉ. रघुनाथ ताम्हाणे तसेच इको क्लबच्या प्रा. सुनीता गायकवाड, प्रा. मच्छिंद्र सोनवणे आणि प्रा. गोविंद गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. महाविद्यालयाच्या समन्वयक डॉ. सुनीता पटनाईक, प्रा. जस्मिन फरास आणि प्रा. वैशाली देशपांडे यांच्या मार्गदर्शनामुळे उपक्रम यशस्वीपणे पार पडला.

 

विद्यार्थ्यांनी महात्मा गांधी यांच्या विचारांचा अंगीकार करून स्वच्छ, शिस्तबद्ध आणि जबाबदार समाजनिर्मितीत योगदान द्यावे, हा उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. कार्यक्रमासाठी प्राचार्या डॉ. वनिता कुऱ्हाडे यांनी मार्गदर्शन केले.


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00