(पिंपरी-चिंचवड) : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आरोग्य, सुरक्षा आणि अन्य विभागांत कार्यरत असलेल्या सुमारे १० हजार कंत्राटी कामगारांना यंदा दिवाळीनिमित्त सानुग्रह अनुदान मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष तथा कामगार नेते यशवंत भाऊ भोसले यांनी केलेल्या मागणीला महापौर रवी लांडगे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. प्रत्येक कंत्राटी कामगाराला किमान १५ हजार रुपये सानुग्रह अनुदान द्यावे, अशी मागणी भोसले यांनी केली (Contract Workers Bonus)आहे.
कामगारांच्या बोनस आणि वेतनासंदर्भात शुक्रवारी (दि. ६) महापौर कार्यालयात यशवंत भोसले आणि महापौर रवी लांडगे यांची बैठक झाली. या बैठकीत कंत्राटी कामगारांच्या सानुग्रह अनुदानाचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. त्यावर महापौरांनी मुख्य लेखापरीक्षकांना अनुदानासाठी आवश्यक आर्थिक तरतुदीचा हिशेब तपासण्याचे निर्देश दिले. तसेच लेखा विभागाचा अभिप्राय सादर करण्यास सांगितले. त्यानंतर सायंकाळी याबाबत घोषणा करण्याचे आश्वासन त्यांनी (Contract Workers Bonus)दिले.
महापौर रवी लांडगे म्हणाले, कंत्राटी कामगार शहर स्वच्छ ठेवण्यापासून आरोग्य आणि सुरक्षा सेवांपर्यंत महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडतात. शहराच्या दैनंदिन सेवा सुरळीत ठेवण्यात त्यांचे मोठे योगदान आहे. त्यांच्या कष्टांची जाणीव ठेवून दिवाळीनिमित्त जास्तीत जास्त सानुग्रह अनुदान देता येईल का, याची आर्थिक तपासणी करण्यास प्रशासनाला सांगितले आहे. आर्थिक हिशेब समोर आल्यानंतर अनुदानाची निश्चित रक्कम ठरवता(Contract Workers Bonus) येईल.
यशवंत भोसले म्हणाले, कंत्राटी कामगारांना कायम कर्मचाऱ्यांप्रमाणे बोनस आणि सानुग्रह अनुदान मिळावे, यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. काही कामगारांच्या वेतनात वाढ करून त्यातून वर्षाला १८ ते १९ हजार रुपये बोनसच्या स्वरूपात मिळाल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र, प्रत्येक कामगाराला प्रत्यक्षात बोनस मिळाला आहे की नाही, याची प्रशासनाने खातरजमा करावी. ज्या कंत्राटदारांकडून बोनसची रक्कम स्वतंत्रपणे दिली जात नाही, त्यांच्या कामगारांना नियमानुसार बोनस मिळणे आवश्यक (Contract Workers Bonus)आहे.
कंत्राटी कामगार अनेकदा अत्यंत कष्टाची आणि अत्यावश्यक स्वरूपाची कामे करतात. त्यामुळे प्रत्येक कामगाराला किमान १५ हजार रुपये सानुग्रह अनुदान द्यावे, अशी मागणी भोसले यांनी केली. महापौरांनी या प्रश्नाबाबत दाखवलेल्या सकारात्मक भूमिकेचे त्यांनी स्वागत (Contract Workers Bonus)केले.
महापौरांनी सायंकाळपर्यंत घोषणा करण्याचे आश्वासन दिल्याने आता प्रशासनाच्या आर्थिक हिशेबाकडे सुमारे १० हजार कंत्राटी कामगारांचे लक्ष लागले आहे. अंतिम अनुदानाची रक्कम किती निश्चित होते, यावर कामगारांची दिवाळी किती गोड होणार, हे स्पष्ट होणार (Contract Workers Bonus)आहे.
