Home क्रीडा U-19 Asia Cup: आर्यवीर सहवागची नेपाळविरुद्ध तुफानी खेळी; ३४ चेंडूंत अर्धशतक

U-19 Asia Cup: आर्यवीर सहवागची नेपाळविरुद्ध तुफानी खेळी; ३४ चेंडूंत अर्धशतक

by Admin
Spread the love

(ओमान):भारताचा माजी आक्रमक फलंदाज वीरेंद्र सहवाग याचा मुलगा आर्यवीर सहवाग याने आपल्या वडिलांच्या आक्रमक फलंदाजीची आठवण करून दिली. १९ वर्षांखालील आशिया चषक स्पर्धेत नेपाळविरुद्ध त्याने तुफानी फलंदाजी करत अवघ्या ३४ चेंडूंत अर्धशतक झळकावले. त्याच्या नाबाद ७० धावांच्या खेळीच्या जोरावर भारताने नेपाळवर १० विकेट्सनी दणदणीत विजय (U-19 Asia Cup)मिळवला.

 

नेपाळने प्रथम फलंदाजी करताना ४२.३ षटकांत सर्वबाद १२८ धावा केल्या. दर्शन सोनारने ४३, तर आशीष लूथारने २९ धावांचे योगदान दिले. मात्र, भारतीय गोलंदाजांनी सुरुवातीपासूनच नेपाळच्या फलंदाजांवर दबाव कायम ठेवला. ईशान सूदने १८ धावांत ३, तर अर्जुन राजपूतने अवघ्या ८ धावांत ३ विकेट्स(U-19 Asia Cup) घेतल्या.

 

विजयासाठी १२९ धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या भारतीय सलामीवीरांनी नेपाळच्या गोलंदाजांना संधीच दिली नाही. आर्यवीर सहवागने आक्रमक फलंदाजी करत ५२ चेंडूंत नाबाद ७० धावा केल्या. त्याच्या खेळीत सात चौकार आणि चार षटकारांचा समावेश होता. अभय यादवच्या गोलंदाजीवर षटकार ठोकत त्याने ३४ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. दुसऱ्या बाजूला लक्ष्य रायचंदानी यानेही त्याला उत्तम साथ दिली. दोघांनीही विकेट न गमावता भारताला विजय मिळवून (U-19 Asia Cup)दिला.

 

आर्यवीरच्या फलंदाजीतील आक्रमकता आणि फटकेबाजी पाहून चाहत्यांना वीरेंद्र सहवागच्या खेळाची आठवण झाली. सोशल मीडियावरही ‘लाइक फादर, लाइक सन’ म्हणत त्याचे कौतुक होत (U-19 Asia Cup)आहे.

 

दरम्यान, भारताचा पुढील सामना ८ नोव्हेंबर रोजी पाकिस्तानविरुद्ध होणार आहे. नेपाळविरुद्ध चमकदार कामगिरी करणारा आर्यवीर या महत्त्वपूर्ण सामन्यातही आपली आक्रमक लय कायम राखतो का, याकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले(U-19 Asia Cup) आहे.

 

 


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00