Home माझं पिंपरी चिंचवड PCMC ASHA Workers Diwali Bonus : आशा स्वयंसेविकांना १५ हजारांपर्यंत प्रोत्साहन भत्ता मंजूर

PCMC ASHA Workers Diwali Bonus : आशा स्वयंसेविकांना १५ हजारांपर्यंत प्रोत्साहन भत्ता मंजूर

पिंपरी-चिंचवड महापालिकेतील आशा स्वयंसेविकांना दिवाळीची भेट. स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांची प्रोत्साहन भत्त्याला मंजुरी; पात्र स्वयंसेविकांना ७ ते १५ हजार रुपये मिळणार.

by Admin
Spread the love

(पिंपरी, दि. ५ नोव्हेंबर ): पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत कार्यरत असलेल्या आशा स्वयंसेविकांना दिवाळीनिमित्त आर्थिक दिलासा मिळणार आहे. आर्थिक वर्ष २०२५-२६ साठी आशा स्वयंसेविकांना प्रोत्साहन भत्ता देण्याच्या प्रस्तावाला स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांनी मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे तळागाळात आरोग्य सेवा देणाऱ्या आशा स्वयंसेविकांना सणासुदीच्या काळात आर्थिक मदत मिळणार (PCMC Asha Workers)आहे.

 

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानांतर्गत (NUHM) महापालिका क्षेत्रातील झोपडपट्ट्या आणि परिसरात गटप्रवर्तक व आशा स्वयंसेविका कार्यरत आहेत. शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार त्यांना कामावर आधारित मोबदला दिला जातो. यंदा त्यांना दिवाळीनिमित्त विशेष प्रोत्साहन भत्ता देण्याचा निर्णय घेण्यात आला (PCMC Asha Workers)आहे.

 

या भत्त्यासाठी सप्टेंबर २०२५ ते ऑगस्ट २०२६ हा कालावधी ग्राह्य धरण्यात येणार आहे. या कालावधीत किमान सहा महिने अर्थात १८० दिवस काम केलेल्या आशा स्वयंसेविकांना भत्त्याचा लाभ मिळणार (PCMC Asha Workers)आहे.

 

७ ते १५ हजार रुपयांपर्यंत मिळणार भत्ता

 

आशा स्वयंसेविकांसाठी प्रोत्साहन भत्त्याची किमान मर्यादा ७ हजार रुपये, तर कमाल मर्यादा १५ हजार रुपये निश्चित करण्यात आली आहे. या भत्त्याचा खर्च महापालिकेच्या वैद्यकीय विभागांतर्गत कुटुंब कल्याण या लेखाशीर्षातील ‘बोनस तथा सानुग्रह अनुदान’ निधीतून करण्यात येणार(PCMC Asha Workers) आहे.

 

याबाबत स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे म्हणाले की, शहराच्या आरोग्य व्यवस्थेचा कणा असलेल्या आशा स्वयंसेविकांच्या निरंतर सेवेचा गौरव व्हावा आणि दिवाळीच्या निमित्ताने त्यांना आर्थिक हातभार लागावा, या उद्देशाने या प्रस्तावाला तातडीने मंजुरी देण्यात आली आहे. या निर्णयामुळे आशा भगिनींची दिवाळी अधिक आनंदात साजरी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त (PCMC Asha Workers)केला.

 

 


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00