Home गुन्हे Pcmc Administrative Changes :प्रमोद ओंभासे निलंबित; पाणीपुरवठा, स्थापत्य, पर्यावरण विभागांच्या जबाबदाऱ्यांत फेरबदल

Pcmc Administrative Changes :प्रमोद ओंभासे निलंबित; पाणीपुरवठा, स्थापत्य, पर्यावरण विभागांच्या जबाबदाऱ्यांत फेरबदल

पिंपरी-चिंचवड महापालिकेचे मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे निलंबित झाल्यानंतर आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी विविध विभागांच्या जबाबदाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सोपवल्या.

by Admin
Spread the love

(पिंपरी-चिंचवड ): लाचखोरी प्रकरणात अटक झाल्यानंतर महापालिकेचे मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे यांना निलंबित करण्यात आले आहे. त्यांच्या निलंबनानंतर त्यांच्याकडील विविध विभागांचा कार्यभार अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आला आहे. महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी प्रशासकीय कामकाजात हे फेरबदल केले (Pcmc Administrative Changes)आहेत.

 

त्यानुसार, सहशहर अभियंता अजय सूर्यवंशी यांच्याकडे पाणीपुरवठा विभागासह भामा आसखेड, आंद्रा पाणीपुरवठा प्रकल्प, पवना बंदिस्त जलवाहिनी आणि सेक्टर २३ जलशुद्धीकरण केंद्राची जबाबदारी देण्यात आली आहे. संध्या वाघ यांच्याकडे स्थापत्य प्रकल्प विभाग, तर विनय ओव्हाळ यांच्याकडे पर्यावरण विभागाचा कार्यभार सोपविण्यात आला आहे. शहर अभियंता मनोज सेठिया यांच्याकडे उद्यान व क्रीडा स्थापत्य विभागाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला (Pcmc Administrative Changes)आहे.

 

 २९ ऑक्टोबरपासून निलंबन; विभागीय चौकशी सुरू

 

प्रमोद ओंभासे यांचे निलंबन २९ ऑक्टोबर २०२६ पासून लागू करण्यात आले आहे. पदाचा आणि अधिकारांचा गैरवापर करून अशोभनीय वर्तन केल्याचा ठपका ठेवत आयुक्तांनी त्यांच्याविरुद्ध विभागीय चौकशीचे आदेश दिले आहेत. संबंधित विभागाला १५ दिवसांत दोषारोपपत्र सादर करण्यासह चौकशी अधिकारी आणि सादरकर्ता अधिकारी नियुक्त करण्याचे निर्देश देण्यात आले (Pcmc Administrative Changes)आहेत.

 

३८ लाखांच्या निविदेच्या फाईलसाठी १९ हजारांची लाच

 

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पडताळणीत ३८ लाख रुपयांच्या निविदेशी संबंधित फाईलवर स्वाक्षरी करण्यासाठी ओंभासे यांनी अर्धा टक्का दराने १९ हजार रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले होते. याप्रकरणी संत तुकारामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली. न्यायालयाने त्यांना १४ नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली (Pcmc Administrative Changes)आहे.

 

निलंबन काळात त्यांना वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पूर्वपरवानगीशिवाय महापालिकेचे मुख्यालय सोडता येणार नाही. तसेच अन्य नोकरी किंवा व्यवसाय करण्यास मनाई करण्यात आली आहे. निर्वाहभत्ता मिळण्यासाठी अन्य नोकरी अथवा व्यवसाय करत नसल्याचा मासिक दाखला सादर करणे बंधनकारक करण्यात आले (Pcmc Administrative Changes)आहे.


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00