Home माझं पिंपरी चिंचवड Vivek Samvad Diwali Ank 2026 : मुकुंद संगोराम यांच्या उपस्थितीत ‘विवेक संवाद’ दिवाळी अंकाचे शानदार प्रकाशन

Vivek Samvad Diwali Ank 2026 : मुकुंद संगोराम यांच्या उपस्थितीत ‘विवेक संवाद’ दिवाळी अंकाचे शानदार प्रकाशन

पुणे इन्फोमीडिया आणि सहकाऱ्यांच्या संयुक्त विद्यमाने प्रकाशित ‘विवेक संवाद दीपोत्सव २०२६’ दिवाळी अंकाचे मान्यवरांच्या उपस्थितीत प्रकाशन. वाचन संस्कृती आणि सकारात्मक विचारांचा जागर.

by Admin
Spread the love

पिंपरी :पुणे इन्फोमीडिया, माय पुणे सिटी, माय पीसीएमसी ग्लोबल आणि मावळ ऑनलाईन यांच्या संयुक्त विद्यमाने प्रकाशित करण्यात आलेल्या ‘विवेक संवाद दीपोत्सव २०२६’ या दिवाळी अंकाचे साहित्य, उद्योग, राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत शानदार प्रकाशन करण्यात (Vivek Samvad Diwali Ank 2026)आले.

 

ज्येष्ठ संपादक मुकुंद संगोराम, उद्योजक रामदास काकडे, टाटा मोटर्सचे निवृत्त वरिष्ठ अधिकारी मनोहर पारळकर, माजी उपमहापौर तथा नगरसेविका शैलजाताई मोरे, ज्येष्ठ नाट्य समीक्षक शंकर घोरपडे, प्रभाग समिती अध्यक्ष मंदार देशपांडे आणि पुणे महानगर नियोजन समितीचे सदस्य संतोष भेगडे यांच्या हस्ते दिवाळी अंकाचे प्रकाशन झाले. यावेळी अंकाचे मुख्य संपादक विवेक इनामदार आणि संपादक श्रीकांत चौगुले उपस्थित(Vivek Samvad Diwali Ank 2026) होते.

 

समाजमाध्यमांच्या वाढत्या प्रभावामुळे माणसांमधील प्रत्यक्ष संवाद कमी होत असून वाचन संस्कृतीही लोप पावत चालली आहे. अशा परिस्थितीत दिवाळी अंकांच्या माध्यमातून सकारात्मक विचारांची देवाणघेवाण आणि वाचन संस्कृतीच्या संवर्धनासाठी पोषक वातावरण निर्माण होऊ शकते, असे मत ज्येष्ठ संपादक मुकुंद संगोराम यांनी व्यक्त केले. समाजात सुसंवादाची आवश्यकता अधोरेखित करत ‘विवेक संवाद’सारखे उपक्रम संवादाची परंपरा समृद्ध करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त(Vivek Samvad Diwali Ank 2026) केला.

 

उद्योजक रामदास काकडे यांनीही बदलत्या जीवनशैलीमुळे कुटुंबातील प्रत्यक्ष संवाद कमी होत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली. विवेक इनामदार यांनी प्रतिकूल परिस्थितीतही दिवाळी अंकाच्या माध्यमातून वाचन संस्कृतीची समृद्ध परंपरा जपण्याचे काम केले आहे. वाचन माणसाला समृद्धीकडे घेऊन जाते, असे त्यांनी नमूद (Vivek Samvad Diwali Ank 2026)केले.

 

मनोहर पारळकर यांनी दर्जेदार साहित्य आणि सकारात्मक विचार समाजापर्यंत पोहोचविण्याच्या उपक्रमाचे कौतुक केले. शैलजाताई मोरे यांनी दिवाळी अंकांची मराठी साहित्यविश्वातील समृद्ध परंपरा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याची गरज व्यक्त केली. शंकर घोरपडे, मंदार देशपांडे आणि संतोष भेगडे यांनीही या उपक्रमाला शुभेच्छा (Vivek Samvad Diwali Ank 2026)दिल्या.

 

नामवंत साहित्यिकांच्या लेखनाने अंक समृद्ध

 

‘विवेक संवाद दीपोत्सव २०२६’ या अंकामध्ये डॉ. श्रीपाल सबनीस, प्रवीण दवणे, डॉ. विठ्ठल वाघ, प्रा. मिलिंद जोशी, डॉ. यशवंत पाटणे, डॉ. पंडित विद्यासागर, डॉ. न. म. जोशी, रमण रणदिवे यांच्यासह अनेक नामवंत साहित्यिकांचे लेखन समाविष्ट आहे. विविध विषय, वैचारिक मांडणी आणि सामाजिक आशय यांमुळे अंकाला साहित्यिक समृद्धी लाभली (Vivek Samvad Diwali Ank 2026)आहे.

 

मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती

 

प्रकाशन सोहळ्यास महापालिकेचे निवृत्त अतिरिक्त आयुक्त रोहिदास कोंडे, माजी नगरसेवक वसंतराव शेवडे, मराठी साहित्य परिषदेच्या पिंपरी-चिंचवड शाखेचे अध्यक्ष राजन लाखे, औटी उद्योग समूहाचे प्रमुख बाबासाहेब औटी, आंतरराष्ट्रीय खेळाडू जयदेव म्हमाणे, साहित्यिक, पत्रकार, उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित(Vivek Samvad Diwali Ank 2026) होते.

 

मावळ तालुक्यातूनही या सोहळ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ह.भ.प. नंदकुमार भसे, पत्रकार मनोहर दाभाडे, सोनबा गोपाळे गुरुजी, भगवान शिंदे, संजय मेहता आणि संतोष पिंपळे यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून दिवाळी अंकाला शुभेच्छा (Vivek Samvad Diwali Ank 2026)दिल्या.

 

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी पुणे इन्फोमीडिया आणि मावळ ऑनलाईनच्या संपूर्ण टीमने विशेष परिश्रम(Vivek Samvad Diwali Ank 2026) घेतले.

 

साहित्य, संस्कृती, समाज आणि माध्यमविश्व यांना जोडणारा ‘विवेक संवाद दीपोत्सव २०२६’ हा दिवाळी अंक वाचनाची मेजवानी देण्याबरोबरच सकारात्मक विचारांची देवाणघेवाण आणि हरवत चाललेल्या संवाद संस्कृतीला नवी दिशा देणारा ठरेल, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात (Vivek Samvad Diwali Ank 2026)आली.

 


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00