PCMC Census:PCMC जनगणना मोहिमेला गती; शहर विकासासाठी महत्त्वपूर्ण माहिती संकलन सुरू

Spread the love

पिंपरी, दि. २८ मे २०२६ — पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडून शहरातील जनगणना मोहिमेला वेग देण्यात आला असून विविध विभागांतील कर्मचारी घरभेटीद्वारे नागरिकांची माहिती संकलित करत आहेत. वाढती लोकसंख्या आणि बदलत्या नागरी गरजांच्या पार्श्वभूमीवर भविष्यातील विकास आराखडे तयार करण्यासाठी ही प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची मानली जात (PCMC census)आहे.

 

जनगणना ही केवळ लोकसंख्येची आकडेवारी गोळा करण्यापुरती मर्यादित नसून शिक्षण, आरोग्य, पाणीपुरवठा, वाहतूक, निवास आणि पायाभूत सुविधांच्या नियोजनासाठी आधारभूत ठरणारी प्रक्रिया आहे. नागरिकांकडून मिळणाऱ्या अचूक माहितीद्वारे विविध शासकीय योजना आणि नागरी सेवा अधिक प्रभावीपणे राबविणे शक्य होणार (PCMC census)आहे.

 

उन्हाळ्याची तीव्रता, विस्तीर्ण नागरी क्षेत्र आणि विविध प्रशासकीय आव्हानांमध्येही जनगणना कर्मचारी सातत्याने घरभेटी घेऊन माहिती संकलनाचे काम करत आहेत. अनेक भागांत नागरिकांशी थेट संवाद साधून आवश्यक तपशील नोंदविले जात असून यामुळे शहराच्या सामाजिक आणि लोकसंख्याविषयक वास्तवाचे अधिक स्पष्ट चित्र समोर येणार(PCMC census) आहे.

 

उप आयुक्त तथा शहर जनगणना अधिकारी सचिन पवार यांनी जनगणना प्रक्रियेत संकलित होणारी माहिती पूर्णपणे गोपनीय ठेवली जात असल्याचे सांगितले. नागरिकांनी कोणतीही शंका न बाळगता अचूक माहिती द्यावी, असे आवाहन त्यांनी(PCMC census) केले.

 

तसेच महापालिका आयुक्त तथा प्रधान जनगणना अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी जनगणना ही शहराच्या भविष्यातील विकासाचा मूलभूत आधार असल्याचे सांगत नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन(PCMC census) केले.

 

महापालिकेने नागरिकांना जनगणना कर्मचाऱ्यांना योग्य माहिती देण्याचे आवाहन केले असून, या प्रक्रियेदरम्यान कोणत्याही प्रकारचा ओटीपी मागितला जात नसल्याने अफवांवर विश्वास ठेवू नये, असेही स्पष्ट करण्यात आले (PCMC census)आहे.

 


Spread the love

Related posts

Ye Aankhen dekhkar:साठवणीतली गाणी पुष्प १८ : ये आँखें देखकर हम सारी दुनिया भूल जाते हैं…

India vs New Zealand 5th T20: भारताचा न्यूझीलंडकडून ७ गडी राखून पराभव

Ujani Dam Project: प्रस्तावित प्रकल्पांविरोधात शेतकरी-कष्टकऱ्यांचा रास्ता रोको