(पिंपरी, दि. २९ ऑक्टोबर ): पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी नागरिक, ठेकेदार किंवा कोणत्याही व्यक्ती अथवा संस्थेकडून भेटवस्तू किंवा देणग्या स्वीकारू नयेत, असे स्पष्ट आदेश महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले आहेत. यासंदर्भात त्यांच्या स्वाक्षरीने परिपत्रक जारी करण्यात आले असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर शिस्तभंगाची कठोर कारवाई करण्यात येणार (PCMC Employeee Circular)आहे.
महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम, १९७९ मधील कलम १२ नुसार शासकीय कर्मचाऱ्यांना भेटवस्तू स्वीकारण्यास निर्बंध आहेत. या नियमांनुसार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी स्वतः भेटवस्तू स्वीकारू नयेत, तसेच त्यांच्या कुटुंबीयांना किंवा त्यांच्या वतीने काम करणाऱ्या व्यक्तींनाही अशा भेटवस्तू स्वीकारण्याची परवानगी देऊ नये, असे परिपत्रकात नमूद करण्यात आले (PCMC Employeee Circular)आहे.
कार्यालयीन व्यवहार असलेल्या व्यक्ती, औद्योगिक किंवा वाणिज्यिक संस्था आणि संघटनांकडून वारंवार केला जाणारा पाहुणचार स्वीकारण्याबाबतही नियमांत स्पष्ट सूचना (PCMC Employeee Circular)आहेत.
महापालिकेच्या सुरक्षा विभागाने कार्यालयात भेटवस्तू घेऊन येणाऱ्या व्यक्तींना प्रवेश देऊ नये, असेही निर्देश देण्यात आले आहेत. प्रशासनात पारदर्शकता आणि नियमांचे काटेकोर पालन सुनिश्चित करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. भेटवस्तू किंवा देणग्या स्वीकारल्याचे आढळल्यास संबंधित अधिकारी अथवा कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा आयुक्तांनी दिला (PCMC Employeee Circular)आहे.