Pimpri-Chinchwad Book Fair: निगडीत ७ ऑक्टोबरपासून राष्ट्रीय पुस्तक मेळा

Spread the love

(निगडी) : भारतीय विचार साधना फाऊंडेशन आणि स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने ७ ते १० ऑक्टोबरदरम्यान सेक्टर २५, निगडी प्राधिकरण येथे राष्ट्रीय पुस्तक मेळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. मेळ्यात ५० हून अधिक प्रकाशकांची हजारो पुस्तके उपलब्ध असतील.

 

इतिहास, संस्कृती, विज्ञान, पर्यावरण, आरोग्य, संतसाहित्य, चरित्रे आणि बालसाहित्य अशा विविध विषयांवरील पुस्तके वाचकांना पाहता येणार आहेत. उद्घाटन ७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६.३० वाजता होणार असून अभिवाचन, पुस्तक प्रकाशन आणि साहित्यिक संवाद असे कार्यक्रमही आयोजित करण्यात आले आहेत.

 

मेळ्याची वेळ सकाळी ९.३० ते रात्री ८.३० अशी आहे असे आयोजकांतफे कळवण्यात आले आहे.

 


Spread the love

Related posts

Fort Building Competition 2026 : पिंपरी-चिंचवडमध्ये महापौर भव्य किल्ले बनवा स्पर्धा; पहिले बक्षीस ५१ हजार

Moshi Garbage Depot : मोशी कचरा डेपोच्या प्रश्नावर महेश लांडगे आक्रमक; शासनाकडे पाठपुरावा करणार

Sahitya Swanand Diwali Ank:सामाजिक सलोखा हे देशाचे बलस्थान – पद्मश्री गिरीश प्रभुणे