Pimpri Crime News : पिंपरीतील वायरे जलतरण तलावात पोहणाऱ्याला मारहाण; व्यवस्थापकासह चौघांवर गुन्हा

Spread the love

(पिंपरी ): जलतरण तलावात पोहण्यासाठी येण्यास मनाई केल्याचा जाब विचारणे आणि २० रुपयांचे तिकीट काढण्यावरून झालेल्या वादातून तलावाच्या व्यवस्थापकासह चौघांनी एका पोहणाऱ्याला मारहाण केल्याची घटना पिंपरी गावातील वायरे जलतरण तलाव येथे घडली. मंगळवारी (दि. ३) सकाळी साडेसातच्या सुमारास हा प्रकार घडला. याप्रकरणी पिंपरी पोलिसांनी चौघांविरोधात गुन्हा दाखल केला(Pimpri Crime News) आहे.

जयप्रकाश हरीश वसवाणी (वय ४८) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. त्यानुसार तलावाचा व्यवस्थापक जयनाथ फडतरे, अक्षय भोकरे आणि अन्य दोन अनोळखी कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला(Pimpri Crime News) आहे.

वसवाणी हे नियमितपणे तलावात पोहण्यासाठी जातात. मासिक १०० रुपये शुल्क असतानाही त्यांच्याकडून प्रत्येकी २० रुपयांचे तिकीट घेतले जात असल्याची तक्रार त्यांनी यापूर्वी ४ सप्टेंबर रोजी पिंपरी पोलिसांकडे केली होती. त्यावरून संबंधितांमध्ये वारंवार वाद होत असल्याचे फिर्यादीत म्हटले(Pimpri Crime News) आहे.

मंगळवारी सकाळी वसवाणी यांनी २० रुपयांचे तिकीट काढून सुमारे दहा मिनिटे पोहण्याचा सराव केला. त्यानंतर बाहेर पडताना अक्षय भोकरे याने त्यांना अडवून तलावात येण्यास मनाई केली होती, असे सांगत वाद घातला. प्रवेश अर्जाची मागणी केल्यानंतर त्यांना धमकावण्यात आले. काही वेळात व्यवस्थापक जयनाथ फडतरे तेथे आला. त्याने वसवाणी यांचा हात पकडून अडवले. त्यानंतर भोकरे आणि अन्य दोन कर्मचाऱ्यांनी मिळून त्यांना हाताने व बुक्क्यांनी मारहाण केली. यात त्यांच्या छातीसह शरीराच्या विविध भागांना दुखापत झाल्याचे फिर्यादीत नमूद(Pimpri Crime News) आहे.

घटनेनंतर वसवाणी यांनी वायसीएम रुग्णालयात उपचार घेतले. त्यानंतर पिंपरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी चौघांविरोधात गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू (Pimpri Crime News)आहे.


Spread the love

Related posts

NavYug Diwali Sandhya 2026 : पारंपरिक काव्यप्रकारांच्या मैफलीने दिवाळीसांज रंगली

Pimpri Dairy Farm Flyover : डेअरी फार्म रेल्वे उड्डाणपुलाचे लोकार्पण; वाहतूक कोंडीतून दिलासा

Anup More Foundation:निगडी येथे दिवाळी पहाटसाठी गाणार अनुराधा पौडवाल