Home महाराष्ट्र Pune Metro Line 3: महिला शक्तीचे दर्शन; महाराष्ट्रातील मेट्रोचे जाळे २०० किमीवर

Pune Metro Line 3: महिला शक्तीचे दर्शन; महाराष्ट्रातील मेट्रोचे जाळे २०० किमीवर

हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोच्या पहिल्या प्रवासाला उत्स्फूर्त प्रतिसाद. महिला ट्रेन पायलटचे सारथ्य, आयटीयन्सचा उत्साह आणि पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यातील चार मार्गिकांचे भूमिपूजन.

by Admin
Spread the love

(पुणे ): पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुणे मेट्रोच्या हिंजवडी ते शिवाजीनगर मार्गिका-३ चे उद्घाटन आणि पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यातील चार नव्या मार्गिकांचे भूमिपूजन मंगळवारी (दि. ३ नोव्हेंबर) पार पडले. या उद्घाटनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्यासह मेट्रोने पहिला प्रवास केला. महिला ट्रेन पायलटचे सारथ्य, शाळकरी विद्यार्थिनी आणि आयटी क्षेत्रातील तरुणांचा उत्साह यामुळे हा पहिला प्रवास विशेष (Pune Metro Line 3)ठरला.

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नव्या मेट्रो मार्गिकेचे पहिले तिकीट स्वतः खरेदी करून प्रवासाला सुरुवात केली. श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल, बालेवाडी ते हिंजवडी फेज-२ या सुमारे सहा किलोमीटरच्या प्रवासात त्यांनी मेट्रोच्या सुविधा, स्थानके आणि प्रवाशांना मिळणाऱ्या सोयींची माहिती घेतली. यावेळी पुणे मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी प्रकल्पाची वैशिष्ट्ये आणि मार्गिकेची माहिती (Pune Metro Line 3)दिली.

 

या पहिल्या प्रवासाचे प्रमुख आकर्षण म्हणजे संपूर्ण मेट्रोचे संचालन महिला कर्मचाऱ्यांच्या हाती होते. लीड ट्रेन पायलट प्रगती बिरादार यांनी मेट्रोचे सारथ्य केले, तर ट्रेन पायलट ऐश्वर्या सूर्यपूजारी यांनीही महत्त्वाची भूमिका बजावली. देशातील पहिल्या पूर्णतः महिला संचालित मेट्रो मार्गिकेच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाचा संदेश देण्यात(Pune Metro Line 3) आला.

 

प्रवासादरम्यान मुख्यमंत्री फडणवीस यांनी शाळकरी विद्यार्थिनी आणि आयटी क्षेत्रातील तरुण-तरुणींशी संवाद साधला. मेट्रो प्रवासाचा अनुभव, स्थानकांवरील सुविधा आणि नव्या मार्गिकेमुळे दैनंदिन वाहतूक कोंडीतून मिळणारा दिलासा याबाबत त्यांनी प्रवाशांकडून प्रतिक्रिया जाणून (Pune Metro Line 3)घेतल्या.

 

या कार्यक्रमाला केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे, पिंपरी-चिंचवडचे महापौर रवी लांडगे, पीएमआरडीएचे आयुक्त अभिजीत चौधरी यांच्यासह विविध लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित (Pune Metro Line 3)होते.

 

दरम्यान, याच कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यातील चार मार्गिकांचे भूमिपूजन करण्यात आले. वनाज ते चांदणी चौक, रामवाडी ते विठ्ठलवाडी, खराडी ते खडकवासला आणि नळस्टॉप ते माणिकबाग या मार्गांचा त्यामध्ये समावेश आहे. सुमारे १३ हजार ५०० कोटी रुपये खर्चाच्या या विस्तारामुळे पुणे शहरातील पूर्व, पश्चिम आणि दक्षिण भागातील मेट्रो संपर्क अधिक व्यापक होणार (Pune Metro Line 3)आहे.

 

नव्या मार्गिकांमुळे खराडी, मगरपट्टा, हडपसर, स्वारगेट, खडकवासला, वारजे, चांदणी चौक आणि वाघोली परिसराला मेट्रोची जोडणी मिळणार आहे. तसेच विविध मार्गांवर अदलाबदल सुविधा उपलब्ध करून विद्यमान मेट्रो जाळे आणि नव्या मार्गिकांमध्ये समन्वय साधला जाणार आहे. भविष्यात प्रस्तावित पुरंदर विमानतळापर्यंत मेट्रो जोडणीचा विस्तार करण्याच्या दृष्टीनेही या प्रकल्पांकडे पाहिले जात (Pune Metro Line 3)आहे.

 

पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भाषणात देशातील मेट्रो जाळ्याच्या विस्ताराचा उल्लेख केला. २०१४ मध्ये देशात २४८ किलोमीटर असलेले मेट्रोचे जाळे आज सुमारे १२०० किलोमीटरपर्यंत पोहोचले असून, २६ शहरांमध्ये मेट्रो सेवा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्रातील मेट्रोचे जाळे २०१४ मधील १० ते ११ किलोमीटरवरून आज सुमारे २०० किलोमीटरपर्यंत विस्तारल्याचे नमूद करताना ६८० किलोमीटरहून अधिक मेट्रो मार्गांची कामे सुरू असल्याची माहितीही त्यांनी (Pune Metro Line 3)दिली.

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे महानगर प्रदेशात मेट्रो, इलेक्ट्रिक बस, रिंगरोड आणि नव्या विमानतळासह आधुनिक वाहतूक सुविधांचे जाळे उभारले जात असल्याचे सांगितले. २०३० पर्यंत हा परिसर देशातील महत्त्वाचे मोबिलिटी केंद्र बनविण्याचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी नमूद (Pune Metro Line 3)केले.

 

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुणे मेट्रोचा विस्तार शहराच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला नवी दिशा देणारा ठरेल, असा विश्वास व्यक्त केला. तर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मार्गिका-३ ही १०० टक्के महिला संचालित मेट्रो असून, या प्रकल्पात सुमारे १०० महिला ट्रेन पायलट आणि ५० टक्के महिला कर्मचारी कार्यरत असल्याचे सांगितले. हिंजवडी परिसरातील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी विशेष टास्क फोर्स कार्यरत करण्यात आल्याची माहितीही त्यांनी (Pune Metro Line 3)दिली.

 

हिंजवडी ते शिवाजीनगर ही २३.२०३ किलोमीटर लांबीची मेट्रो मार्गिका सुरू झाल्याने पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील आयटी क्षेत्रातील कर्मचारी, विद्यार्थी आणि नागरिकांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. बुधवारपासून (दि. ४ नोव्हेंबर) पहिल्या टप्प्यातील १७ स्थानकांवर प्रवासी सेवा सुरू होत आहे. दुसऱ्या टप्प्यातील नव्या मार्गिकांच्या विस्तारामुळे पुणे महानगर प्रदेशातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम होण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल पडले (Pune Metro Line 3)आहे.

 


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00