Home क्रीडा Mohammed Shami Retirement :मोहम्मद शमीची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती; ६४ कसोटींमध्ये २२९ विकेट्स

Mohammed Shami Retirement :मोहम्मद शमीची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती; ६४ कसोटींमध्ये २२९ विकेट्स

भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने वयाच्या ३६व्या वर्षी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. १३ वर्षांच्या कारकिर्दीत ६४ कसोटी सामने आणि २२९ बळींची उल्लेखनीय कामगिरी.

by Admin
Spread the love

(पिंपरी-चिंचवड, विवेक कुलकर्णी ): भारतीय क्रिकेटमधील वेगवान गोलंदाजीला नवी ओळख देणारा अनुभवी गोलंदाज मोहम्मद शमी याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. विशेष म्हणजे, ६ नोव्हेंबर २०१३ रोजी कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी पदार्पण करणाऱ्या शमीने बरोबर १३ वर्षांनंतर, ६ नोव्हेंबर २०२६ रोजी याच क्रिकेट प्रकाराला अलविदा केला. वयाच्या ३६व्या वर्षी त्याने हा निर्णय (Mohammad Shami Retirement) घेतला.

 

६४ कसोटी सामन्यांत २७.७१ च्या सरासरीने २२९ बळी ही शमीची कामगिरी भारतीय क्रिकेटसाठी महत्त्वपूर्ण ठरली. त्याने सहा वेळा एका डावात पाच किंवा त्यापेक्षा अधिक बळी घेण्याची कामगिरी केली. भारतीय संघात एकेकाळी दर्जेदार वेगवान गोलंदाजांची कमतरता जाणवत असताना शमीने आपल्या स्विंग, सीम मूव्हमेंट आणि अचूक टप्प्यावरील गोलंदाजीने स्वतःचे वेगळे स्थान निर्माण (Mohammad Shami Retirement)केले.

 

कोहलीच्या नेतृत्वाखाली शमीच्या गोलंदाजीला विशेष धार आली. विराट कोहलीच्या कर्णधारपदाच्या काळात त्याने ४६ कसोटी सामन्यांत २४.८२ च्या सरासरीने १६८ बळी घेतले. याच काळात त्याने पाच वेळा एका डावात पाच बळी घेण्याची कामगिरी केली. रवी शास्त्री प्रशिक्षक असताना भारतीय वेगवान गोलंदाजीच्या ताफ्याला नवी ताकद मिळाली. शमी हा या आक्रमणातील महत्त्वाचा आधारस्तंभ होता. शास्त्री यांनी त्याच्या क्षमतेवर विश्वास दाखवत त्याच्याकडून सर्वोत्तम कामगिरी करून (Mohammad Shami Retirement) घेतली.

 

शमीचा क्रिकेटप्रवासही संघर्षातून घडलेला आहे. उत्तर प्रदेशातील अमरोहा जिल्ह्यातील एका छोट्या गावातून त्याने क्रिकेटची सुरुवात केली. त्याचे वडील तौसीफ अली स्वतः वेगवान गोलंदाज होते. मुलातील गुणवत्ता ओळखून त्यांनी शेतात सिमेंटची खेळपट्टी तयार केली. तिथेच शमीने वेगवान गोलंदाजीचा सराव केला. पुढे प्रशिक्षक बदरुद्दीन सिद्दीकी यांच्या मार्गदर्शनाखाली त्याने मेहनत घेतली आणि क्रिकेटमधील संधी शोधण्यासाठी कोलकात्याचा रस्ता धरला. क्लब क्रिकेटमधील संघर्षापासून भारतीय संघापर्यंतचा त्याचा प्रवास अनेक तरुण क्रिकेटपटूंसाठी प्रेरणादायी (Mohammad Shami Retirement)आहे.

 

कारकिर्दीच्या या प्रवासात दुखापतींनीही त्याची अनेकदा परीक्षा घेतली. मात्र प्रत्येक वेळी पुनरागमन करण्याची जिद्द त्याने दाखवली. २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकात त्याने अवघ्या सात सामन्यांत २४ बळी घेत भारतीय संघाच्या गोलंदाजीची धुरा समर्थपणे सांभाळली. न्यूझीलंडविरुद्ध ५७ धावांत सात बळी ही त्याची कामगिरी आजही संस्मरणीय आहे. मात्र त्यानंतर दुखापतींमुळे त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला खंड पडला. कसोटी क्रिकेटमधील त्याचा अखेरचा सामना २०२३ च्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध (Mohammad Shami Retirement) झाला.

 

यानंतर शमीने देशांतर्गत क्रिकेटमध्ये पुनरागमनासाठी प्रयत्न सुरू ठेवले. रणजी स्पर्धेतही त्याने बळी मिळवले. मात्र भारतीय कसोटी संघात त्याला पुन्हा स्थान मिळाले नाही. अखेर कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेत त्याने लाल चेंडूच्या क्रिकेटमधील प्रवास (Mohammad Shami Retirement)संपवला.

 

शमीने एकदिवसीय आणि टी-२० क्रिकेट खेळत राहण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे त्याच्या चाहत्यांना मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये त्याची गोलंदाजी पाहण्याची संधी मिळणार आहे. मात्र कसोटी क्रिकेटमध्ये त्याने गाजवलेला काळ पुन्हा अनुभवता येणार नाही, ही खंत निश्चितच (Mohammad Shami Retirement)राहील.

 

६४ कसोटी सामने, २२९ बळी, सहा पाच बळींची कामगिरी आणि अनेक अविस्मरणीय स्पेल असा शमीचा कसोटी प्रवास भारतीय क्रिकेटच्या इतिहासात नोंदला जाईल. निवड, दुखापती आणि पुनरागमनाच्या संघर्षातून मार्ग काढणाऱ्या या वेगवान गोलंदाजाने भारतीय क्रिकेटला दिलेले योगदान विसरता येणार (Mohammad Shami Retirement) नाही.

 

कसोटी क्रिकेटवर मनापासून प्रेम करणाऱ्या क्रिकेटरसिकांच्या स्मरणात मोहम्मद शमीचे नाव कायम राहील. लाल चेंडूला निरोप देताना त्याच्या १३ वर्षांच्या कसोटी कारकिर्दीला (Mohammad Shami Retirement)सलाम!

 

 

 

 


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00