Home आरोग्य PCMC Blood Donation: महापालिका रुग्णालयांत रक्तदान शिबिरे; १९६ जणांचे रक्तदान

PCMC Blood Donation: महापालिका रुग्णालयांत रक्तदान शिबिरे; १९६ जणांचे रक्तदान

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सेवा संकल्प अभियानांतर्गत चार रुग्णालयांत रक्तदान शिबिरे आयोजित करण्यात आली. १५ महिलांसह १९६ नागरिकांनी रक्तदान केले.

by Admin
Spread the love

(पिंपरी, दि. ९ ऑक्टोबर) : राष्ट्रीय ऐच्छिक रक्तदान दिन आणि ‘सेवा संकल्प अभियानांतर्गत’ पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागातर्फे शहरातील चार महापालिका रुग्णालयांत रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले. या शिबिरांमध्ये १५ महिलांसह एकूण १९६ नागरिकांनी रक्तदान केले. यावेळी सामूहिक रक्तदानाची शपथही घेण्यात(PCMC Blood Donation Camp) आली.

 

आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे आणि अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अभयचंद्र दादेवार यांच्या मार्गदर्शनाखाली जिजामाता रुग्णालय, स्व. इंदिरा गांधी रुग्णालय (सांगवी), नवीन थेरगाव रुग्णालय आणि आकुर्डी येथील ह. भ. प. प्रभाकर मल्हारराव कुटे स्मृती रुग्णालय येथे ही शिबिरे घेण्यात (PCMC Blood Donation Camp)आली.

 

शिबिरांच्या आयोजनासाठी संबंधित रुग्णालयांतील वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. वाय.सी.एम. रुग्णालयाच्या रक्तपेढीच्या प्रभारी डॉ. नीता घाडगे, रक्त संक्रमण अधिकारी डॉ. गणेश लोंढे आणि त्यांच्या पथकाने सहकार्य (PCMC Blood Donation Camp)केले.

 

“रक्तदान हे मानवतेची सेवा करण्याचे महत्त्वपूर्ण माध्यम आहे. गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध होण्यासाठी नागरिकांनी रक्तदानासाठी पुढाकार घ्यावा,” असे आवाहन महापालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी (PCMC Blood Donation Camp)केले.

 


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00