Home माझं पिंपरी चिंचवड Dr Vijay Suryavanshi:आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी ७५ बेघर व्यक्तींसोबत साजरी केली दिवाळी

Dr Vijay Suryavanshi:आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी ७५ बेघर व्यक्तींसोबत साजरी केली दिवाळी

पिंपरीतील सावली निवारा केंद्रात आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी ७५ बेघर व्यक्तींसोबत दिवाळी साजरी केली. लाभार्थ्यांशी संवाद साधत केंद्राच्या कार्याचे कौतुक केले.

by Admin
Spread the love

(पिंपरी, दि. ७ नोव्हेंबर २०२६ ): नात्यांची साथ हरवलेल्या आणि निराधार आयुष्य जगणाऱ्या व्यक्तींच्या आयुष्यात मायेचा प्रकाश निर्माण करण्यासाठी महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी पिंपरी येथील ‘सावली’ निवारा केंद्रातील ७५ बेघर व्यक्तींसोबत दिवाळी साजरी केली. यावेळी त्यांनी लाभार्थ्यांसोबत फराळ करत त्यांच्या सुख-दुःखाची आस्थेने विचारपूस केली. त्यांच्या जीवनातील संघर्ष आणि वेदनादायी अनुभव ऐकताना आयुक्त भावूक (Dr Vijay Suryavanshi)झाले.

 

महापालिकेच्या समाज विकास विभागामार्फत आणि ‘रिअल लाइफ रिअल पीपल’ या संस्थेच्या सहकार्याने हे निवारा केंद्र चालवले जाते. बेघर, निराधार तसेच मानसिक व शारीरिक आजारांनी त्रस्त व्यक्तींना येथे सुरक्षित निवारा, अन्न, औषधोपचार आणि आवश्यक आधार दिला (Dr Vijay Suryavanshi)जातो.

 

भेटीदरम्यान आयुक्तांनी प्रत्येक लाभार्थ्याशी स्वतंत्रपणे संवाद साधत निवारा, भोजन, औषधोपचार आणि उपलब्ध सुविधांबाबत माहिती घेतली. संस्थेच्या कर्मचाऱ्यांकडून लाभार्थ्यांची घेतली जाणारी काळजी आणि त्यांना दिली जाणारी सन्मानपूर्वक वागणूक याचे त्यांनी कौतुक केले. तसेच केंद्राच्या कामकाजातील अडचणी आणि स्थापत्यविषयक समस्यांची माहिती घेऊन आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना महापालिका अधिकाऱ्यांना (Dr Vijay Suryavanshi)दिल्या.

 

यावेळी उपायुक्त अण्णा बोदडे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, संस्थेचे एम. ए. हुसैन, व्यवस्थापक गौतम थोरात आणि समाजसेवक ॲग्नस फ्रान्सिस उपस्थित(Dr Vijay Suryavanshi) होते.

 

“प्रत्येक व्यक्तीला अन्न, वस्त्र आणि निवाऱ्यासोबतच प्रेम, आपुलकी आणि सन्मानाची वागणूक मिळणेही महत्त्वाचे आहे. सावली केंद्राच्या माध्यमातून हे काम संवेदनशीलतेने केले जात आहे. केंद्रातील प्रत्येक लाभार्थ्याची काळजी घेणे ही आपली सामाजिक जबाबदारी आहे,” असे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी (Dr Vijay Suryavanshi)सांगितले.

 


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00