Atulya Dongre:NEET 2026 मध्ये AIR 498 मिळवणाऱ्या अतुल्या डोंगरे यांचा महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते गौरव

Spread the love

(पिंपरी, दि. २९ ): NEET 2026 परीक्षेत अखिल भारतीय स्तरावर (AIR) ४९८ वा क्रमांक मिळवत पिंपरी-चिंचवडचे नाव उज्ज्वल करणाऱ्या कु. अतुल्या डोंगरे हिचा पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी पुष्पगुच्छ आणि स्मृतिचिन्ह देऊन तिच्या उल्लेखनीय यशाचा गौरव करण्यात आला.

 

यावेळी महापौर रवि लांडगे म्हणाले, “कठोर परिश्रम, सातत्यपूर्ण अभ्यास, शिस्त आणि आत्मविश्वास यांच्या बळावर कोणतेही ध्येय गाठता येते, हे अतुल्या डोंगरे हिने सिद्ध करून दाखवले आहे. तिचे यश केवळ तिच्या कुटुंबासाठी नव्हे, तर संपूर्ण पिंपरी-चिंचवड शहरासाठी अभिमानाची बाब आहे. तिच्या यशातून शहरातील हजारो विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळेल.”

 

महापौरांनी विद्यार्थ्यांना योग्य नियोजन, सातत्यपूर्ण मेहनत आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आपल्या ध्येयासाठी प्रयत्नशील राहण्याचे आवाहन केले. गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यासाठी महानगरपालिका कायम कटिबद्ध असल्याचेही त्यांनी सांगितले.

 

अतुल्या डोंगरे हिने आपल्या यशाचे श्रेय आई-वडील, शिक्षक आणि कुटुंबीयांच्या पाठिंब्याला दिले. सातत्यपूर्ण अभ्यास, वेळेचे नियोजन आणि आत्मविश्वासामुळे हे यश मिळाल्याचे सांगत विद्यार्थ्यांनी कोणत्याही परिस्थितीत हार न मानता आपल्या ध्येयासाठी प्रयत्न सुरू ठेवावेत, असा संदेश तिने दिला.

 

यावेळी उपस्थित मान्यवरांनी अतुल्या डोंगरे हिचे अभिनंदन करून तिच्या पुढील वैद्यकीय शिक्षणासाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

 


Spread the love

Related posts

Fort Building Competition 2026 : पिंपरी-चिंचवडमध्ये महापौर भव्य किल्ले बनवा स्पर्धा; पहिले बक्षीस ५१ हजार

Moshi Garbage Depot : मोशी कचरा डेपोच्या प्रश्नावर महेश लांडगे आक्रमक; शासनाकडे पाठपुरावा करणार

Sahitya Swanand Diwali Ank:सामाजिक सलोखा हे देशाचे बलस्थान – पद्मश्री गिरीश प्रभुणे