Home प्रेरणा / यशकथा Pavana Cleanliness Drive:संस्कार प्रतिष्ठानतर्फे पवना नदी व घाट स्वच्छता अभियान

Pavana Cleanliness Drive:संस्कार प्रतिष्ठानतर्फे पवना नदी व घाट स्वच्छता अभियान

चिंचवड येथील रिव्हर व्ह्यू घाटावर संस्कार प्रतिष्ठानतर्फे पवना नदी व घाट स्वच्छता अभियान राबविण्यात आले. सुमारे ४० सभासदांनी सहभाग घेत स्वच्छतेचा आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश दिला.

by Admin
Spread the love

(चिंचवड) : केवळ स्वच्छतेच्या घोषणा न देता प्रत्यक्ष कृतीतून सामाजिक बांधिलकी जपण्याचा संदेश संस्कार प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य, पिंपरी-चिंचवड शहर यांच्या वतीने देण्यात आला. ‘आधी केले मग सांगितले’ या संकल्पनेतून रिव्हर व्ह्यू घाट, बिर्ला हॉस्पिटल रोड, चिंचवड येथे पवना नदी व घाट स्वच्छता अभियान राबविण्यात (Pavana Cleanliness Drive)आले.

 

‘एक तास नदीसाठी, एक तास स्वच्छतेसाठी’ या उपक्रमांतर्गत प्रतिष्ठानचे सुमारे ४० सभासद सहभागी झाले. यावेळी घाटावरील आणि पायऱ्यांवरील वाढलेले गवत काढण्यात आले. तसेच नदीपात्रातील प्लास्टिकच्या पिशव्या, विविध प्रकारचे हार आणि अन्य कचरा गोळा करून परिसराची स्वच्छता करण्यात आली. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आरोग्य कर्मचारीही या अभियानात सहभागी झाले (Pavana Cleanliness Drive)होते.

 

स्वच्छता अभियानानंतर कार्यकर्त्यांनी स्वच्छतेच्या घोषणा देत नागरिकांमध्ये जनजागृती केली. अभियानाच्या समारोपप्रसंगी सर्व सभासदांनी स्वच्छतेची प्रतिज्ञा घेतली. स्वतःच्या कुटुंबासह इतर नागरिकांनाही परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी प्रवृत्त करण्याचा संकल्प यावेळी करण्यात (Pavana Cleanliness Drive)आला.

 

याप्रसंगी संस्कार प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ. मोहन गायकवाड, मनोहर कड, सुधाकर खुडे, प्रभाकर मेरुकर, संध्या स्वामी, महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी प्रकाश खलसे, पल्लवी नायक, सिद्धी जोशी, कविता वाल्हे, पांडुरंग सुतार, अरुण कळंबे, विलास सैद, जयवंत सूर्यवंशी, बाजीराव पतंगे, जितेंद्र जाधव, सतीश उघडे, रमेश भिसे, शिवाजी पाटील, धनंजय सावंत, शुभदा फुलंबरकर आणि पिंपरी-चिंचवड इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य डॉ. ए. एम. फुलंबरकर यांच्यासह प्रतिष्ठानचे सदस्य उपस्थित(Pavana Cleanliness Drive) होते.


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00