(पिंपरी) : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १६ मधील विस्कळीत पाणीपुरवठ्याच्या समस्येकडे तातडीने लक्ष देऊन नियमित व पुरेशा दाबाने पाणीपुरवठा सुरू करावा, अन्यथा १ नोव्हेंबर रोजी ठिय्या आंदोलन करण्यात येईल, असा इशारा नगरसेविका ऐश्वर्या राजेंद्र तरस यांनी दिला आहे. यासंदर्भात त्यांनी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे सहशहर अभियंता अजय सूर्यवंशी तसेच विद्युत विभागाचे सहशहर अभियंता श्री. कावळे यांना निवेदन दिले (PCMC Water Supply)आहे.
प्रभाग क्रमांक १६ अंतर्गत विकासनगर, वापदेव नगर, दत्तनगर, किवळे, रावेत, वाल्हेकरवाडी, गुरुद्वारा परिसर, साईनगर तसेच मामुर्डी या भागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून पाणीपुरवठा अत्यंत कमी दाबाने होत असून, काही ठिकाणी अपुरा व अनियमित पाणीपुरवठा होत असल्याचे निवेदनात नमूद केले आहे. त्यामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्यासह दैनंदिन गरजांसाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत (PCMC Water Supply)आहे.
या गंभीर समस्येमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी असून, प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून संबंधित भागांतील पाणीपुरवठा नियमित, पुरेशा दाबाने आणि वेळेवर सुरू करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी, अशी मागणी तरस यांनी केली (PCMC Water Supply)आहे.
१ नोव्हेंबरपूर्वी पाणीपुरवठ्याची परिस्थिती सुधारली नाही, तर नागरिकांच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात येईल. या आंदोलनामुळे उद्भवणाऱ्या परिस्थितीची जबाबदारी संबंधित प्रशासनाची राहील, असा इशाराही त्यांनी निवेदनातून दिला(PCMC Water Supply) आहे.