PCMC Crime News: मारहाण, फसवणूक, चोरी; गुन्हेगारीच्या विविध घटना

Spread the love

(पिंपरी-चिंचवड ): पगार मागितल्याच्या रागातून सुपरवायजरच्या गळ्यावर कोयत्याने वार करणे, पोलीस असल्याचे भासवून ज्येष्ठ नागरिकांचे दागिने लंपास करणे, बनावट कागदपत्रांच्या आधारे ४० लाख रुपयांची फसवणूक आणि कंपन्यांमधील साहित्याची चोरी अशा विविध घटना पिंपरी-चिंचवड आणि परिसरात समोर आल्या आहेत. याशिवाय मारहाण, वाहन अपघात, विनापरवाना शस्त्र बाळगणे आणि तडीपारीच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणीही पोलिसांनी गुन्हे दाखल केले (Pcmc Crime News)आहेत.

 

पगार मागितल्याने सुपरवायजरच्या गळ्यावर कोयत्याने वार

 

रावेत येथील शांताई कॉर्नर चौकात पगार मागितल्याच्या रागातून सुपरवायजरच्या गळ्यावर कोयत्याने वार करून त्यांना गंभीर जखमी करण्यात आले. १२ ऑक्टोबर रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास ही घटना घडली. ज्ञानेश्वर विश्वास पाटील (वय ३८) यांनी रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार गजानन पवार आणि परशुराम वारे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पगार मागितल्याने आणि कामावर येणार नसल्याचे सांगितल्याने आरोपींनी धमकी देत हा हल्ला केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. याशिवाय निलेश मगन गर्दे यांनाही हाताने व पट्ट्याने मारहाण करण्यात (Pcmc Crime News)आली.

 

मोशीत पोलीस असल्याचे भासवून १.८० लाखांचे दागिने लंपास

 

मोशीतील बोऱ्हाडेवाडी परिसरात पोलीस असल्याचे भासवून दोन अनोळखी दुचाकीस्वारांनी ७७ वर्षीय बबन भाऊसाहेब बोन्हाडे यांची फसवणूक केली. १३ ऑक्टोबर रोजी सकाळी सव्वाअकराच्या सुमारास ही घटना घडली. आरोपींनी पोलिसांचे ओळखपत्र दाखवून दागिने रुमालात ठेवण्यास सांगितले आणि हातचलाखीने २० ग्रॅम वजनाची सोन्याची चैन व १० ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी, असा एकूण एक लाख ८० हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला (Pcmc Crime News)आहे

 

पिंपळे सौदागरमध्ये सीआयडी अधिकारी असल्याचे सांगून २.५५ लाखांचे दागिने चोरीला

 

पिंपळे सौदागर येथील कुंजीर चौकात सीआयडी अधिकारी असल्याचे भासवून दोन अनोळखी व्यक्तींनी ७५ वर्षीय नारायण ओंकार कासार यांची फसवणूक केली. १३ ऑक्टोबर रोजी सकाळी सव्वाअकराच्या सुमारास आरोपींनी दागिने सुरक्षित ठेवण्याच्या बहाण्याने सहा ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी आणि सोन्याची साखळी असलेली रुद्राक्षाची माळ घेतली. या दागिन्यांची एकूण किंमत दोन लाख ५५ हजार रुपये आहे. याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला(Pcmc Crime News) आहे.

 

बनावट कागदपत्रांद्वारे ४० लाखांची फसवणूक केल्याचा आरोप

 

बावधन येथे बांधकाम प्रकल्पातील फ्लॅटच्या व्यवहारासाठी बँकेने मंजूर केलेले ४० लाख रुपये अन्य व्यक्तीच्या खात्यात वळविल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यासाठी बनावट लेटरहेड, शिक्का आणि स्वाक्षरी असलेली कागदपत्रे वापरल्याचा आरोप आहे. याप्रकरणी बांधकाम व्यावसायिक मयुरेश विलास खोलकुटे यांच्या फिर्यादीवरून राहुल शंकरराव मोरबाळे यांच्याविरुद्ध बावधन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डिसेंबर २०२२ मध्ये हा प्रकार घडल्याचे फिर्यादीत नमूद (Pcmc Crime News)आहे.

 

हिंजवडीत गैरसमजातून मारहाण; दोघे गंभीर जखमी

 

मारहाण झाल्याच्या गैरसमजातून हिंजवडी परिसरातील मारुंजी येथील श्रीराम चौकात तिघांनी दोघांना लोखंडी कड्याने मारहाण केली. १२ ऑक्टोबर रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली. या हल्ल्यात कुलदीप प्रकाश परबत आणि हर्षद मिरगणे यांच्या डोक्याला व डोळ्याखाली दुखापत झाली. मुस्कान गुप्ता यांनाही मारहाण करून शिवीगाळ करण्यात आली. याप्रकरणी चैतन्य धनंजय इवरे आणि दोन महिलांविरुद्ध हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, एका महिला आरोपीला अटक करण्यात आली(Pcmc Crime News) आहे.

 

महाळुंगेत अपघात; दुचाकीस्वार गंभीर जखमी

 

महाळुंगे गावच्या हद्दीतील सिग्मा चौकाजवळ अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने राहुल धोंडीबा पेरके (वय ३१) गंभीर जखमी झाले. १२ ऑक्टोबर रोजी रात्री सव्वाआठच्या सुमारास संसेरा इंजिनिअरिंग कंपनीसमोर हा अपघात झाला. अपघातानंतर जखमीला मदत न करता वाहनचालक पसार झाला. याप्रकरणी दक्षिण महाळुंगे पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला (Pcmc Crime News)आहे.

सुतारवाडीत कारची दोन दुचाकींना धडक; तरुणी गंभीर

 

बावधनकडून बाणेरकडे जाणाऱ्या सेवा रस्त्यावर सुतारवाडी येथील सातबारा हॉटेलसमोर भरधाव कारने दोन दुचाकींना धडक दिली. ११ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री पावणेतीनच्या सुमारास घडलेल्या या अपघातात अंकिता खेत्रे गंभीर जखमी झाली, तर अथर्व साबळे, श्लोक पाटील आणि निकिता आवारी किरकोळ जखमी झाले. अपघातानंतर कारचालक पसार झाला. याप्रकरणी बावधन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला (Pcmc Crime News)आहे.

 

कंपनीतून ७५२ किलो अॅल्युमिनियम साहित्याची चोरी

 

महाळुंगे इंगळे येथील सद्गुरू ऑटो कंपोनंट्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीतून ७५२ किलो वजनाचे अॅल्युमिनियमचे कच्चे साहित्य चोरीला गेले. या मालाची किंमत दोन लाख ३१ हजार ६१६ रुपये आहे. ११ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ही घटना घडल्याचे फिर्यादीत नमूद आहे. कंपनीचे संचालक विराज आनंद महाळुंगकर यांच्या तक्रारीवरून पर्यवेक्षक शिवम अच्छेलाल यादव आणि चालक आशिष श्रीनिवास साकेत यांच्याविरुद्ध दक्षिण महाळुंगे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला (Pcmc Crime News)आहे.

 

भोसरीत विनापरवाना तलवार बाळगल्याप्रकरणी गुन्हा

 

भोसरीतील सखुबाई गवळी उद्यानाजवळ विनापरवाना तलवार बाळगल्याप्रकरणी राहुल विनोद बनसोड (वय २६) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १३ ऑक्टोबर रोजी पहाटे साडेपाचच्या सुमारास पोलिसांनी त्याच्याकडून तलवार जप्त केली. घातक शस्त्रे बाळगण्यास मनाई असतानाही तलवार जवळ बाळगल्याचा आरोप (Pcmc Crime News)आहे.

 

पिंपरीत देशी बनावटीचे पिस्तूल आणि काडतूस जप्त

 

पिंपरीतील एच. ए. कॉलनी परिसरात बंद पडलेल्या वसतिगृहाजवळ कार्तिक श्रीनिवास शिंगाडे (वय २६) याच्याकडे विनापरवाना देशी बनावटीचे पिस्तूल आणि जिवंत काडतूस आढळले. १३ ऑक्टोबर रोजी सकाळी अकराच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी ५० हजार रुपये किमतीचे पिस्तूल आणि एक हजार रुपये किमतीचे काडतूस जप्त केले. याप्रकरणी संत तुकारामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला(Pcmc Crime News) आहे.

 

तडीपार आदेशाचे उल्लंघन; औंधमध्ये चाकूसह तरुणाला अटक

 

दोन वर्षांसाठी तडीपार केलेले असतानाही पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत प्रवेश करून विनापरवाना चाकू बाळगल्याप्रकरणी आशिष अनिल कांबळे (वय २६) याला अटक करण्यात आली. १३ ऑक्टोबर रोजी रात्री आठच्या सुमारास औंध जिल्हा रुग्णालयाच्या प्रवेशद्वारासमोर ही कारवाई झाली. कांबळे याला ७ नोव्हेंबर २०२४ ते ७ नोव्हेंबर २०२६ या कालावधीसाठी तडीपार करण्यात आले होते. असे असतानाही तो हद्दीत आढळल्याने आणि त्याच्याकडे लोखंडी चाकू सापडल्याने सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला(Pcmc Crime News) आहे.

या सर्व प्रकरणांचा संबंधित पोलीस ठाण्यांकडून पुढील तपास सुरू (Pcmc Crime News)आहे.


Spread the love

Related posts

Sahitya Swanand Diwali Ank:सामाजिक सलोखा हे देशाचे बलस्थान – पद्मश्री गिरीश प्रभुणे

Pratibha College Chinchwad :प्रतिभा महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून वात्सल्य संस्थेसाठी ४,५०० मेणबत्ती पाकिटांचे पॅकिंग

Ye Aankhen dekhkar:साठवणीतली गाणी पुष्प १८ : ये आँखें देखकर हम सारी दुनिया भूल जाते हैं…