PCMC Action: पिंपळे गुरवमध्ये ४३२ चौ.मी. अनधिकृत बांधकामावर कारवाई

Spread the love

(पिंपरी ): पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ‘ड’ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील पिंपळे गुरव, प्रभाग क्रमांक २९ येथील प्रभात नगरमध्ये सुमारे ४३२ चौ.मी. क्षेत्रफळाच्या आरसीसी अनधिकृत बांधकामावर महापालिकेने कारवाई केली.

 

महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या आदेशानुसार, अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर व उपायुक्त अतुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. सहायक आयुक्त तथा क्षेत्रीय अधिकारी अश्विनी गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली धडक कारवाई पथकाने ही कारवाई केली.

 

कारवाईत बीट निरीक्षक विकास वारभुवन, सचिन फडतरे, रूपक शिनगारे, शिवानी भगत यांच्यासह पाच मजूर, महाराष्ट्र सुरक्षा दलाचे १५ जवान आणि तीन पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते. कारवाईसाठी एक जॉ क्रशर, दोन जेसीबी आणि एक ट्रॅक्टर ब्रेकरचा वापर करण्यात आला.

 

महापालिका हद्दीत अनधिकृत बांधकामांवर नियमानुसार कारवाई सुरूच राहणार असून, नागरिकांनी बांधकाम करण्यापूर्वी आवश्यक परवानग्या घ्याव्यात आणि नियमांचे पालन करावे, असे आवाहन आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केले.


Spread the love

Related posts

Ye Aankhen dekhkar:साठवणीतली गाणी पुष्प १८ : ये आँखें देखकर हम सारी दुनिया भूल जाते हैं…

Ujani Dam Project: प्रस्तावित प्रकल्पांविरोधात शेतकरी-कष्टकऱ्यांचा रास्ता रोको

Signature Park Society:डांगे चौकातील सिग्नेचर पार्कमध्ये आई-मुलाचा मृत्यू