(पिंपरी-चिंचवड, दि. २९ सप्टेंबर २०२६ ): पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत अनधिकृतपणे राहणाऱ्या परदेशी नागरिकांविरोधात पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. दहशतवाद विरोधी शाखा (ATB) आणि परकीय नागरिक नोंदणी विभागाने (FRO) बावधन पोलिसांच्या मदतीने संयुक्त कारवाई करत व्हिसाची मुदत संपल्यानंतरही भारतात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या २६ वर्षीय अफगाण नागरिकाला ताब्यात घेतले. दानयार हुसेन असे त्याचे नाव (Illegal Foreign Citizen)आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आयुक्तांच्या सूचनेनुसार अनधिकृत परदेशी नागरिकांचा शोध घेत असताना एका अफगाण विद्यार्थ्याच्या बेकायदेशीर वास्तव्यासंदर्भात एफआरओकडून माहिती मिळाली. एटीबीचे पोलीस निरीक्षक विकास राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली तांत्रिक विश्लेषण आणि बातमीदारांच्या मदतीने शोध घेतला असता दानयार हा बावधन बुद्रुक येथील पेबल्स अरबानिया सोसायटीतील एका फ्लॅटमध्ये राहत असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर २८ सप्टेंबर रोजी पोलिसांनी कारवाई करून त्याला ताब्यात(Illegal Foreign Citizen) घेतले.
चौकशीत दानयार हा मॉडर्न कॉलेज, शिवाजीनगर येथे एम.ए. (इकोनॉमिक्स)च्या द्वितीय वर्षात शिक्षण घेत असल्याचे समोर आले. मात्र, जानेवारी २०२६ पासून तो महाविद्यालयात गैरहजर होता. कागदपत्रांच्या पडताळणीत भारतात राहण्याची त्याची अधिकृत मुदत ३१ जानेवारी २०२६ रोजी संपली असून, त्याने मुदतवाढ घेतली नसल्याचे (Illegal Foreign Citizen)आढळले.
व्हिसाची मुदत संपल्यानंतरही तो अनधिकृतपणे राहत असल्याने त्याला देशाबाहेर पाठविण्याची (डिपोर्ट) कारवाई बावधन पोलीस आणि एफआरओकडून सुरू करण्यात आली(Illegal Foreign Citizen) आहे.
परदेशी नागरिकांची माहिती देण्याचे आवाहन
कोणताही परदेशी नागरिक वास्तव्यास आल्यास घरमालक, हॉटेल व्यावसायिक आणि संबंधित नागरिकांनी २४ तासांच्या आत ‘सी-फॉर्म’ भरून एफआरओ कार्यालयाला माहिती देणे बंधनकारक आहे. माहिती न दिल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल. तसेच परिसरात अनधिकृत परदेशी नागरिक राहत असल्याचे आढळल्यास तातडीने पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पिंपरी-चिंचवड पोलिसांनी केले (Illegal Foreign Citizen)आहे.
