Home माझं पिंपरी चिंचवड Pimpri-Chinchwad Book Fair: निगडीत ७ ऑक्टोबरपासून राष्ट्रीय पुस्तक मेळा

Pimpri-Chinchwad Book Fair: निगडीत ७ ऑक्टोबरपासून राष्ट्रीय पुस्तक मेळा

पिंपरी-चिंचवडमध्ये ७ ते १० ऑक्टोबरदरम्यान राष्ट्रीय पुस्तक मेळा; ५० हून अधिक प्रकाशकांची हजारो पुस्तके आणि विविध साहित्यिक कार्यक्रमांचे आयोजन.

by Admin
Spread the love

(निगडी) : भारतीय विचार साधना फाऊंडेशन आणि स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने ७ ते १० ऑक्टोबरदरम्यान सेक्टर २५, निगडी प्राधिकरण येथे राष्ट्रीय पुस्तक मेळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. मेळ्यात ५० हून अधिक प्रकाशकांची हजारो पुस्तके उपलब्ध असतील.

 

इतिहास, संस्कृती, विज्ञान, पर्यावरण, आरोग्य, संतसाहित्य, चरित्रे आणि बालसाहित्य अशा विविध विषयांवरील पुस्तके वाचकांना पाहता येणार आहेत. उद्घाटन ७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६.३० वाजता होणार असून अभिवाचन, पुस्तक प्रकाशन आणि साहित्यिक संवाद असे कार्यक्रमही आयोजित करण्यात आले आहेत.

 

मेळ्याची वेळ सकाळी ९.३० ते रात्री ८.३० अशी आहे असे आयोजकांतफे कळवण्यात आले आहे.

 


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00