Home आरोग्य Morya Multispeciality:मोरया हॉस्पिटलच्या नवीन कक्षांचे नामकरण; देणगीदारांचा गौरव

Morya Multispeciality:मोरया हॉस्पिटलच्या नवीन कक्षांचे नामकरण; देणगीदारांचा गौरव

चिंचवड येथील मोरया मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलच्या नवीन कक्षांचे नामकरण करण्यात आले. सोनिगरा फाउंडेशनसह देणगीदारांनी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला.

by Admin
Spread the love

(पिंपरी ) : चिंचवड येथील मोरया मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलच्या नवीन कक्षांचे नामकरण करण्यात आले. खासदार श्रीरंग बारणे, जनकल्याण समितीचे महाराष्ट्र कार्यकारिणी सदस्य विनायकराव डंबिर, उद्योजक दिलीप सोनिगरा, हॉस्पिटलचे अध्यक्ष डॉ. अरविंद पंडित, विश्वस्त डॉ. अविनाश वाचासुंदर, उद्योजक समीर पाटील, भगवान तांबे, डॉ. अक्षय वाचासुंदर आणि रक्षा देशपांडे उपस्थित होते.

कै. नरराज पुरखराज सोनिगरा फाउंडेशनने हॉस्पिटलला एक कोटी रुपयांची देणगी दिली. तसेच डॉ. जगदीश ढेकणे , डॉ. निलिमा अमृते, डॉ. सरपोतदार, डॉ. संजीव कानिटकर, डॉ. अविनाश वाचासुंदर, उद्योजक राजेश बाफना, ज्येष्ठ समाजसेवक सुरेश धोका, उद्योजक राजेश अग्रवाल आणि महावीर स्वामी जैन श्वेतांबर मंदिर ट्रस्ट यांनी प्रत्येक कक्षासाठी देणगी दिली. त्यांनी सुचविलेली नावे कक्षांना देण्यात आली. सर्व देणगीदारांचा गौरव करून सत्कार करण्यात आला.

 


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00