(पिंपरी-चिंचवड ): पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे नगरसेवक संदीप बाळकृष्ण वाघेरे यांचे वडील आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाळकृष्ण रघुनाथ वाघेरे यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत असून, राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातून शोक व्यक्त केला जात(Balkrishna Raghunath Waghere) आहे.
बाळकृष्ण वाघेरे यांनी अनेक वर्षे सामाजिक क्षेत्रात कार्यरत राहून नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घेतला. परिसराच्या विकासासह विविध सामाजिक आणि लोककल्याणकारी उपक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता. नागरिकांच्या अडीअडचणींमध्ये मदतीला धावून जाणारे व्यक्तिमत्त्व म्हणून ते परिचित (Balkrishna Raghunath Waghere)होते.
त्यांच्या निधनामुळे वाघेरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. संदीप वाघेरे यांनी वडिलांच्या रूपाने मार्गदर्शक गमावल्याची भावना व्यक्त होत (Balkrishna Raghunath Waghere)आहे.
बाळकृष्ण वाघेरे यांच्या निधनाबद्दल शहरातील राजकीय नेते, नगरसेवक, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातील पदाधिकारी आणि नागरिकांनी शोक व्यक्त केला. तसेच वाघेरे कुटुंबीयांचे सांत्वन करून दिवंगत बाळकृष्ण वाघेरे यांना श्रद्धांजली अर्पण(Balkrishna Raghunath Waghere) केली.
