(पिंपरी, दि. १९ ): पुणे पदवीधर मतदारसंघाच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता युवा मोर्चा, पिंपरी-चिंचवड शहर शाखेची नियोजन बैठक शहराध्यक्ष दिनेश यादव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीत संघटनात्मक बांधणी, बूथनिहाय नियोजन आणि पदवीधर मतदारांशी संपर्क वाढविण्यावर विशेष भर देण्यात (BJP Yuva Morcha)आला.
बैठकीला विधानपरिषद आमदार तथा पिंपरी विधानसभा प्रभारी प्रसाद लाड, आमदार स्नेहाताई दुबे-पंडित, भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, आमदार उमा खापरे, आमदार अमित गोरखे, संघटन सरचिटणीस मोरेश्वर शेडगे, प्रदेश सदस्य सदाशिव खाडे आणि शहर पदवीधर प्रमुख राजेश पिल्ले उपस्थित(BJP Yuva Morcha) होते.
आगामी निवडणुकीत प्रत्येक प्रभागात बूथनिहाय रचना मजबूत करण्यासोबतच पदवीधर मतदारांच्या प्रत्यक्ष भेटी घेणे, उमेदवारांचा परिचय करून देणे, मतदान प्रक्रियेबाबत जनजागृती करणे आणि मतदानाच्या दिवशी मतदारांना मतदान केंद्रापर्यंत पोहोचविण्यासाठी कार्यकर्त्यांनी सक्रिय भूमिका बजावावी, अशा सूचना बैठकीत करण्यात (BJP Yuva Morcha)आल्या.
यावेळी प्रभारी अजित कुलथे, सरचिटणीस राहुल खाडे, सुमित काटे, दिनेश काटे, प्रसाद कस्पटे, गणेश सस्ते, राजेश डोंगरे, सम्यक साबळे, साची दोशी, उपाध्यक्ष रवि भिलारे, गौरव शिरुडे, अमित देशमुख, कृष्णा कदम, जयदीप करपे, दयानंद बंडगर, विशाल वाघेरे, मनोज माळी, प्रशांत बाराथे, सचिव आशिष राऊत, अजय मोरे, प्रतीक भालेराव, निखिल शहाणे, यश सांभेराव, जालिंदर काटे, रोहित कराळे यांच्यासह मंडल अध्यक्ष प्रशांत अलमेल, ऋषिकेश भालेकर, यश वाल्हेकर तसेच विविध विभागांचे पदाधिकारी उपस्थित(BJP Yuva Morcha) होते.
बैठकीचे संयोजन उपाध्यक्ष मनोज घोडेकर आणि सचिव आदम मुलानी यांनी केले. पदवीधर मतदारांपर्यंत प्रभावी संपर्क, बूथस्तरावरील संघटन मजबूत करणे आणि निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांची तयारी अधिक सक्षम करण्यावर बैठकीत भर देण्यात (BJP Yuva Morcha)आला.
